Pune Crime | पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या; चिंचवडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 19:55 IST2023-02-25T19:53:12+5:302023-02-25T19:55:01+5:30
मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली...

Pune Crime | पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या; चिंचवडमधील घटना
पिंपरी : पतीकडून वारंवार शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सोनाली विराज चितारे (वय २०) असे आहे. ही घटना २९ ऑक्टोबर २०२० ते २३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत चिंचवड येथे घडली. या प्रकरणी सोनालीच्या आईने पिंपरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. २५) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विराज अजय चितारे (वय २४, रा. चिंचवड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी सोनाली हिला आरोपीने किरकोळ कारणावरून वारंवार शिवीगाळ करत मारहाण करत होता. आरोपीकडून फिर्यादीच्या मुलीला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. शिवाय या विषयी कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी आरोपी देत होता. या त्रासाला कंटाळून सोनाली हिने गळफास लावून आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे.