PCMC Election Results 2026 : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक मतमोजणीत नियोजनाचा फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:34 IST2026-01-16T10:34:03+5:302026-01-16T10:34:59+5:30
- प्रभाग १६, १७, १८ व २२ मध्ये गोंधळ; ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड

PCMC Election Results 2026 : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक मतमोजणीत नियोजनाचा फज्जा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होऊनही प्रभाग क्रमांक १६, १७, १८ आणि २२ च्या मतमोजणीदरम्यान प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे मतमोजणी प्रतिनिधींची गैरसोय झाली.
पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट
सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रतिनिधींना कोणतीही स्पष्ट सूचना न देता ताटकळत गेटच्या बाहेर उभे ठेवण्यात आले. एकीकडे पोस्टल मतदानाची मोजणी सुरू असतानाही दुसरीकडे मीडिया कक्षातील डिस्प्ले बंद असल्याने निकालाची अधिकृत माहिती वेळेत उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे प्रतिनिधी, उमेदवारांचे समर्थक तसेच पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली.मतमोजणीसारख्या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या प्रक्रियेत वेळेचे काटेकोर नियोजन, माहितीची पारदर्शकता आणि समन्वय अपेक्षित असतो. मात्र येथे या तिन्ही बाबींचा अभाव ठळकपणे जाणवला. परिणामी, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
PCMC Election Results 2026 : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक मतमोजणीत नियोजनाचा फज्जा #PCMCElection#Results2026#MaharashtraElections2026pic.twitter.com/m06UjT2IdB
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
या गोंधळाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने स्पष्टीकरण द्यावे, तसेच पुढील टप्प्यांमध्ये अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. निवडणूक अधिकारी राजाराम सरगर याना या बाबत विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले