Pimpri Chinchwad: व्हिडीओ तयार करून तरुणाला रेल्वेखाली टाकण्याचा ‘प्लॅन’, जुन्या भांडणातून मारहाण
By रोशन मोरे | Updated: December 2, 2023 18:03 IST2023-12-02T18:02:33+5:302023-12-02T18:03:12+5:30
पिंपरी : वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून निघालेल्या तरुणाला अडवून जुन्या भांडणाच्या रागातून नऊ जणांनी मारहाण केली. त्याच्या मोबाइलमध्ये खोटे रेकॉर्डिंग ...

Pimpri Chinchwad: व्हिडीओ तयार करून तरुणाला रेल्वेखाली टाकण्याचा ‘प्लॅन’, जुन्या भांडणातून मारहाण
पिंपरी : वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून निघालेल्या तरुणाला अडवून जुन्या भांडणाच्या रागातून नऊ जणांनी मारहाण केली. त्याच्या मोबाइलमध्ये खोटे रेकॉर्डिंग तयार करून त्याला रेल्वेखाली टाकण्याची त्यांची योजना होती. ही घटना गुरूवारी (दि. ३०) रात्री साडेनऊ ते साडेअकरा या दरम्यान चिंचवड ते चिंचवड स्टेशन दरम्यान घडली.
या प्रकरणी रोहन मच्छिंद्र यादव (वय १९, रा. चिंचवड) याने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनय उर्फ अरुण गब्बर भोसले, इंदर भोसले, बंटी कांबळे, अजय भोसले यांच्यासह पाच महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन वाढदिवसासाठी त्याच्या मित्राला आणायला दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून एका संशयित महिलेने आणि तिच्या साथीदारांनी रोहनला अडवले. जुन्या भांडणाच्या रागातून महिला आणि तिच्या साथीदारांनी शिवीगाळ करत सिमेंटच्या गट्टूने रोहनला मारहाण केली. तसेच जबरदस्तीने दुचाकीवर बसवून चिंचवडमधील गोलांडे चाळ येथे आणले. तेथे रोहन याला मारण्यासाठी त्याच्या मित्रानेच लोक पाठवले, असे खोटे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून त्याला चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील पत्राशेड येथे आणले. रोहनला रेल्वेखाली टाकून देऊ, असे संशयितांचे बोलणे सुरू होते. मात्र, संशयित विनयच्या फोनवर कोणाचा तरी फोन आल्याने रोहनला त्याच्या आई-वडिलांकडे सोडण्यात आले. या घटनेविषयी कोणाला सांगितलेस तर सोडणार नाही, म्हणून धमकीही देण्यात आली.