Municipal Election2026: भाजपने वीस तासांनी जाहीर केले वीस प्रभागाचे उमेदवार
By विश्वास मोरे | Updated: December 31, 2025 14:11 IST2025-12-31T14:10:35+5:302025-12-31T14:11:32+5:30
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक आखाड्यात युती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे घोंगडे शेवटच्या भिजत पडले होते.

Municipal Election2026: भाजपने वीस तासांनी जाहीर केले वीस प्रभागाचे उमेदवार
पिंपरी : महापालिकेच्या निवडणूक आखाड्यात बंडखोरी होऊ नये, म्हणून भाजपने दक्षता घेतली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीबाबत गुप्तता पाळली होती. एबी फॉर्मचा गोंधळ राञभर सुरु होता. अर्ज भरण्याच्या मुदतीनंतर सुमारे वीस तासांनी बुधवारी दुपारी दीडला भाजपने २० प्रभागांचे ८० उमेदवार जाहीर केले आहेत. अजूनही १२ प्रभागांचे ४८ नावे जाहीर केली नाहीत. विद्यमान नगरसेवक पत्ते कापले आहेत. आयारामाना उमेदवारी जाहीर केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक आखाड्यात युती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे घोंगडे शेवटच्या भिजत पडले होते. बंडखोरी होऊ नये, यासाठी दक्षता घेतली आहे. तर पहिल्या टप्प्यात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील ६० जणांची उमेदवारी दिली होती.
ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, त्यांना संदेश पाठविले आहेत. व सकाळी आपणास एबी फ़ॉर्म दिला जाईल असे सांगितले आहे. काही आमदारांनी आपल्या समर्थकांना एबी फ़ॉर्म दिले होते. तर काहीजण प्रतीक्षेत होते. शहरातील स्थानिक आमदार आणि शहराध्यक्ष यांनी उमेदवारीबाबत गुप्तता पाळली होती. मंगळवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरु होता. त्यामुळे अधिकृत यादी जाहीर झाली नाही. आयारामाना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बंडखोरी रोखण्याचे आव्हान आहे.
भाजपचे उमेदवार
प्रभाग क्र. १. चिखली
अ : सुरेश म्हेत्रे
ब : सोनम मोरे
क : शीतल यादव
ड : गणेश मळेकर
.....
प्रभाग क्र. २, जाधववाडी, मोशी
अ . सुजाता बोराटे
ब . सारिका बोऱ्हाडे
क . निखिल बोऱ्हाडे
ड. राहुल जाधव
......
प्रभाग ३, चऱ्होली
अ : नितीन काळजे
ब : सचिन तापकीर
क : सारिका गायकवाड
ड : अर्चना सस्ते
.....
प्रभाग ७ गावठाण भोसरी
अ. संतोष लोंढे
ब. प्रा. सोनाली गव्हाणे
क. राणीमाई पठारे
ड. ॲड. नितीन लांडगे
.....
प्रभाग क्र. ४ दिघी बोपखेल
अ. हिरानानी घुले
ब. श्रुती डोळस
क. कृष्णा सुरकुले
ड : उदय गायकवाड
....
प्रभाग क्र. ५. गव्हाणे वस्ती
अ. जालिंदर शिंदे
ब. सागर गवळी
क. अनुराधा गोफणे
ड. कविता भोंगाळे
......
प्रभाग क्र. ६, धावडे वस्ती
अ. रवि लांडगे
ब. योगेश लांडगे
क. राजश्री लांडगे
ड. रेखा देवकर
....
प्रभाग क्र. ७ शीतल बाग
अ. संतोष लोंढे
ब. सोनाली गव्हाणे
क. राणीमाई पठारे
ड: नितीन लांडगे
.....
प्रभाग क्र. ८ इंद्रायणी नगर
अ. विलास मडिगेरी
ब. नम्रता लोंढे
क. . निलम लांडगे
ड. डॉ. सुहास कांबळे
.....
प्रभाग क्र. ९ मासुळकर, नेहरूनगर
अ . सदगुरु कदम
ब. शितल मासुळकर
क. मीनाज इनामदार
ड . कमलेश वाळके
....
प्रभाग १०, मोरवाडी, शाहूनगर
अ : अनुराधा गोरखे
ब : सुप्रिया चांदगुडे
क : तुषार हिंगे
ड : कुशाग्र कदम
.....
प्रभाग क्र. ११, कृष्णनगर
अ. कुंदन गायकवाड
ब. निलेश नेवाळे
क. योगिता नागरगोजे
ड. रिटा सानप
....
प्रभाग क्र. १२, तळवडे
अ. प्रवीण भालेकर
ब. शितल वर्णेकर
क. शिवानी नरळे
ड. शांताराम भालेकर
....
प्रभाग क्र. १३, निगडी गावठाण
अ. प्रियंका देशमुख
ब . अर्चना करांडे
क. अनिल घोलप
ड. उत्तम केंदळे
....
प्रभाग क्र. १७, चिंचवडेनगर
अ. आशा सुर्यवंशी
ब. नामदेव ढाके
क. पल्लवी वाल्हेकर
ड. सचिन चिंचवडे
...
प्रभाग क्र. २१ पिंपरी गाव, वैभव नगर
अ. मोनिका निकाळजे
ब. गणेश ढाकणे
क. उषा वाघेरे
ड. नरेश पंजाबी
.....
प्रभाग क्र. २७ रहाटणी श्रीनगर, तापकीरनगर
अ. बाबासाहेब त्रिभुवन
ब. सविता खुळे
क. अर्चना तापकीर
ड. चंद्रकांत नखाते
...
प्रभाग क्र. २८ रहाटणी, पिंपळे सौदागर
अ. शत्रुघ्न (बापू) काटे
ब. अनिता काटे
क. कुंदा भिसे
ड. संदेश काटे
.....
प्रभाग क्र. ३२, सांगवी गावठाण
अ. तृप्ती कांबळे
ब. हर्षल ढोरे
क. उषा ढोरे
ड. प्रशांत शितोळे