PCMC Election Results 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये 'काका-पुतण्या'ची आघाडी भाजपला जड? सुरुवातीच्या कलात चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:06 IST2026-01-16T11:05:45+5:302026-01-16T11:06:13+5:30

भाजप १३, राष्ट्रवादी १० जागांवर आघाडीवर

PCMC Election Results 2026 Is the 'uncle-nephew' alliance a tough one for BJP in Pimpri-Chinchwad? A close race in the early stages | PCMC Election Results 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये 'काका-पुतण्या'ची आघाडी भाजपला जड? सुरुवातीच्या कलात चुरस

PCMC Election Results 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये 'काका-पुतण्या'ची आघाडी भाजपला जड? सुरुवातीच्या कलात चुरस

पिंपरी-चिंचवड: औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला वेग आला आहे. १२८ जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत सुरुवातीचे कल अत्यंत रंजक दिसत आहेत. २०१७ मध्ये एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला यंदा अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादी आघाडीने (NCP Alliance) मोठे आव्हान दिल्याचे चित्र आहे.

 

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट

राष्ट्रवादीचा करिश्मा: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन निवडणूक लढवल्याचा फायदा होताना दिसत आहे. भोसरी आणि चिंचवडमधील काही महत्त्वाच्या वॉर्डमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे.

भाजपचा बालेकिल्ला: पिंपरी आणि निगडी परिसरात भाजपने आपली आघाडी टिकवून ठेवली आहे. गेल्या वेळच्या ७५ जागांचा आकडा यंदा भाजप गाठणार का, याकडे लक्ष आहे.

मनसेचे खाते उघडले: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये मनसेने एका जागेवर आघाडी मिळवली असून राज ठाकरे यांच्या "दुबार मतदार" मोहिमेचा प्रभाव कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे.

बिनविरोध जागा: एकूण १२८ जागांपैकी २ जागांवर आधीच बिनविरोध निवड झाली असल्याने आज १२६ जागांचा निकाल स्पष्ट होईल.

Web Title : PCMC चुनाव 2026: पिंपरी-चिंचवड में NCP गठबंधन ने BJP को दी चुनौती।

Web Summary : पिंपरी-चिंचवड नगर निगम चुनाव में कांटे की टक्कर। अजित पवार और शरद पवार के नेतृत्व वाले NCP गठबंधन ने BJP के वर्चस्व को कड़ी चुनौती दी है। शुरुआती रुझानों में करीबी मुकाबला दिख रहा है, MNS भी आगे बढ़ रही है। 126 सीटों के नतीजे प्रतीक्षित हैं।

Web Title : PCMC Election 2026: NCP alliance challenges BJP in Pimpri-Chinchwad.

Web Summary : Pimpri-Chinchwad witnesses intense competition in the municipal elections. The NCP alliance, led by Ajit Pawar and Sharad Pawar, poses a strong challenge to the BJP's dominance. Initial trends show a close contest, with MNS also gaining ground. Results for 126 seats are awaited.