महाविकास आघाडीचे प्रयत्न होतायेत असफल; आता कलाटेंची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 15:05 IST2023-02-10T15:04:26+5:302023-02-10T15:05:15+5:30
विधानसभा पोटनिवडणूक पोट निवडणुकीत अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटचे काही तास उरले.

महाविकास आघाडीचे प्रयत्न होतायेत असफल; आता कलाटेंची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते दाखल
पिंपरी : शिवसेना बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते वाकड मध्ये दाखल झालेले आहेत. बंद दाराआड चर्चा सुरू आहे. विधानसभा पोटनिवडणूक पोट निवडणुकीत माघारी अर्ज माघारी साठी शेवटचे काही तास उरलेले आहेत.
मात्र, महाविकास आघाडीतील बंडखोरी रोखण्यात अद्याप नेत्यांना यश आलेले नाही. आज सकाळपासून बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे.
दुपारी एक वाजता मावळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोर भेगडे, माजी महापौर योगेश बहल, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे हे कलाटे यांची मनधरणी करत आहेत. योगेश बहल म्हणाले, '' कलाटे यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे, त्यांनी माघार घ्यावी. यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे.''