महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीत मतदानाचा टक्का घसरला ; मावळमध्ये वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 01:36 PM2019-10-22T13:36:49+5:302019-10-22T13:47:09+5:30

Pimpri Election 2019 : चिंचवडमध्ये ४३९, भोसरीत ४११, पिंपरीत ३९९ आणि मावळमधील ३७० मतदान केंद्रांवर झाले मतदान..

Maharashtra Election 2019 : Voter percentage decreased in Pimpri, but maval good condition | महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीत मतदानाचा टक्का घसरला ; मावळमध्ये वाढला

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीत मतदानाचा टक्का घसरला ; मावळमध्ये वाढला

Next
ठळक मुद्दे मतदान यंत्र बंद पडणे, चुकीची नावे असणे अशा तक्रारी वगळता शांततेत मतदान

पिंपरी : विधानसभा निवडणुकीतील पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ या मतदारसंघांमध्ये मतदान झाले. चिंचवड आणि भोसरीतमतदानाचा टक्का घसरला असून, मावळमध्ये तो वाढला आहे. या चार मतदारसंघांतील ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदान यंत्र बंद पडणे, चुकीची नावे असणे अशा तक्रारी वगळता चिंचवड, भोसरी आणि मावळमध्ये शांततेत मतदान झाले. तर, पिंपरीत बोगस मतदान केल्याचा आरोप करण्यात आला. तर माजी महापौर डब्बू आसवानी यांना मारहाणीचा प्रकार घडला. 
विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी झाले. मतदानाची प्रक्रिया सकाळी सातपासून सुरू झाली होती. पिंपरी, चिंचवड,  मावळ आणि भोसरी या मतदारसंघांतील १,६१९ मतदान केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी दिसत होती. चिंचवडमध्ये ४३९, भोसरीत ४११, पिंपरीत ३९९ आणि मावळमधील ३७० मतदान केंद्रांवर सकाळी सातपासूनच मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती. 
विधानसभा निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात आली आहे. आज सकाळपासूनच पावसाचे वातावरण असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होती की काय असे चिन्ह होते़ मात्र पहिल्या टप्प्यामध्ये चांगले मतदान झाले आहे. दुपारनंतर पावसाने पूर्णपणेउघडीप दिली. त्यामुळे दुपारी तीनवाजेपर्यंत मावळमध्ये ५३.०६, चिंचवडमध्ये ३५.६९, पिंपरीत ३१.२८, भोसरीत ४०.४५ टक्के मतदान झाले.  
भोसरी मतदारसंघामध्ये नवमतदारांचा उत्साह वाखण्याजोगा होता. दुपारनंतर अनेक तरुणी व महिला यांनी घराबाहेर पडून 
आपला मतदानाचा हक्क बजावला. अनेक केंद्रांवर सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते. त्याठिकाणी उत्सफूर्तपणे तरुणांनी फोटो काढले. तरुण मतदार ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येत होते. त्यांना नावे शोधून देण्यास मदत करत होते. 
...........
रांगेत ज्येष्ठाचा मृत्यू
पिंपरी : मतदान करण्यासाठी रांगेत उभे असताना एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी भोसरी येथे घडली. अब्दुल रहीम नूरमहंमद शेख (वय ६०, रा. शांतीनगर वसाहत, भोसरी) असे या मृत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019 : Voter percentage decreased in Pimpri, but maval good condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.