Kirit Somaiya: पत्रकारांच्या प्रश्नावर किरीट सोमय्या का भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 04:26 PM2021-10-13T16:26:32+5:302021-10-13T16:29:10+5:30

पिंपरी : आपण ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतायत त्या पक्षातील लोक भाजपमध्ये आले तर तुमची भूमिका काय असेल? या प्रश्नावर ...

kirit somaiya angry on jounalist questions pimpri chinchwad | Kirit Somaiya: पत्रकारांच्या प्रश्नावर किरीट सोमय्या का भडकले?

Kirit Somaiya: पत्रकारांच्या प्रश्नावर किरीट सोमय्या का भडकले?

Next

पिंपरी: आपण ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतायत त्या पक्षातील लोक भाजपमध्ये आले तर तुमची भूमिका काय असेल? या प्रश्नावर माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) चांगलेच भडकले. सोमय्या यांनी प्रश्नांला बगल देत, कुणीही असलं तरी त्यांची चौकशी व्हायला हवी, असं उत्तर दिलं. मात्र हे उत्तर देत असताना सोमय्या यांचा संताप अनावर झाल्याचं दिसून आले.

माजी खासदार किरीट सोमय्यापुणे दौऱ्यावर आहेत. भाजपचे विधी सल्लागार प्रमुख अॅड. सचिन पटवर्धन यांची भेट घेतली. त्यावेळी  पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी दुपारी तीनला गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले होते. महाविकास आघाडीतील सुमारे १८ मंत्री भ्रष्ट आहेत, असा वारंवार आरोप करणारे किरीट सोमय्या पिंपरीत  पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर चांगलेच भडकले.

माध्यमांच्या प्रतिनिंधीनी सोमय्या यांना गाठले. ‘‘आपण ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतायत त्या पक्षातील लोक भाजपमध्ये आले तर तुमची भूमिका काय असेल?  असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला सोमय्या यांनी बगल दिली. पुन्हा तोच प्रश्न विचारल्याने ‘‘कुणीही असलं तरी त्यांची चौकशी व्ह्यायला हवी, असं उत्तर दिलं. त्यावेळी त्यांचा पारा वाढल्याचे दिसून आले.

Web Title: kirit somaiya angry on jounalist questions pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app