दारु पिण्यासाठी पैसे देत नाही, थांब तुझे हात पाय तोडतो! मामावर भाच्याचा कोयत्याने हल्ला

By रोशन मोरे | Updated: September 9, 2023 18:17 IST2023-09-09T18:16:32+5:302023-09-09T18:17:17+5:30

ही घटना शुक्रवारी (दि.८) भैरवनाथ नगर, पिंपळे गुरव येथे घडली...

It doesn't pay to drink alcohol, stop breaking your arms and legs! Nephew attacked uncle with a knife | दारु पिण्यासाठी पैसे देत नाही, थांब तुझे हात पाय तोडतो! मामावर भाच्याचा कोयत्याने हल्ला

दारु पिण्यासाठी पैसे देत नाही, थांब तुझे हात पाय तोडतो! मामावर भाच्याचा कोयत्याने हल्ला

पिंपरी : मामाकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, ते मामाने दिले नाहीत. त्यामुळे शिविगाळ करत पैसे देत नाही थांब तुझे हात पाय तोडतो असे म्हणत भाचा मामाच्या अंगावर धावून गेला. तसेच मामा लपून बसलेला असताना बाथरुमच्या खिडक्या दरवाज्यावर कोयत्याने वार करत तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी (दि.८) भैरवनाथ नगर, पिंपळे गुरव येथे घडली. या प्रकरणी विनोद शिवाजी जाधव (वय ३४, रा.भैरवनाथनगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित अक्षय दशरथ शिंदे (२३, रा.भैरवनाथनगर, पिंपळे गुरव) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी विनोद यांना त्यांचा भाचा संशयित अक्षय याने दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, विनोद यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे संशयित तुझे हात पाय तोडतो असे म्हणत विनोद यांच्या अंगावर धावून गेला. जीवाच्या भीतीेने विनोद हे बाथरुमध्ये लपले असता संशयिताने थेट कोयता घेत किचन हाॅल, बाथरुमच्या खिडक्या व दरवाज्यावर कोयत्याने वार करून तोडफोड केली.

Web Title: It doesn't pay to drink alcohol, stop breaking your arms and legs! Nephew attacked uncle with a knife