Chinchwad By-election | नाना काटे यांच्यामागे शिवसेनेची ताकद - सचिन आहिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 12:47 IST2023-02-17T12:44:24+5:302023-02-17T12:47:09+5:30
या निवडणुकीमध्ये कोणतीही पक्षविरोधी कृती सहन केली जाणार नाही....

Chinchwad By-election | नाना काटे यांच्यामागे शिवसेनेची ताकद - सचिन आहिर
पिंपरी :चिंचवड विधानसभेची निवडणूक ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीमध्ये कोणतीही पक्षविरोधी कृती सहन केली जाणार नाही. संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सर्व ताकद महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या पाठीशी उभी करा, असे आदेश शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी बैठकीत गुरुवारी दिले.
महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षाच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बैठकीत सचिन आहिर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहरप्रमुख सचिन भोसले, महिला संपर्क संघटिका लता पाष्टे, चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, माजी शहराध्यक्ष योगेश बाबर, युवा सेनेचे अनिकेत घुले, उपशहर प्रमुख हरीश नखाते, श्रीमंत गिरी यांच्यासह विभागप्रमुख, शाखाप्रमुख व संघटकप्रमुख उपस्थित होते.
चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पाठीशी राहून शिवसेना गद्दार व त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना धडा शिकवा. कोणत्याही फसव्या प्रचाराला बळी पडू नका आणि नाना काटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा.
- सचिन आहिर, संपर्कप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे