आचारसंहिता भंगाच्या मावळमध्ये २४१ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:41 AM2019-04-25T00:41:57+5:302019-04-25T00:42:15+5:30

नागरिकांची सजगता वाढली; ऑनलाइन तक्रारीचे प्रमाण ९५ टक्के

241 complaints in violation of code of ethics | आचारसंहिता भंगाच्या मावळमध्ये २४१ तक्रारी

आचारसंहिता भंगाच्या मावळमध्ये २४१ तक्रारी

Next

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या २५३ तक्रारी दाखल झाल्या असून, सर्वच तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. त्यात आॅनलाइन तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. २४१ तक्रारी आॅनलाइन आणि १२ तक्रारी आॅफलाइन दाखल झाल्या आहेत. निवडणुकीबाबत नागरिकांची सजगता वाढल्याचे दिसून येत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत.

सर्वाधिक तक्रारी पिंपरी विधानसभेत
आचारसंहिता भंगाच्या सर्वाधिक तक्रारी पिंपरीत दाखल झाल्या आहेत. ९२ तक्रारी पिंपरीत तर त्यापाठोपाठ चिंचवडला ८२, मावळला ४४ आणि सर्वांत कमी तक्रारी पनवेलमध्ये दाखल झाल्या आहेत. तसेच आॅफलाइन तक्रारी सर्वाधिक चार या पिंपरी विधानसभेत, चिंचवडमध्ये तीन आणि मावळ, उरणमध्ये प्रत्येकी एक तक्रार दाखल झाली आहे. आचारसंहिता भंगाच्या २५३ तक्रारींवर कार्यवाही केली असून, सर्वच तक्रारी निकाली काढल्या आहेत. प्रलंबित तक्रारी अजिबात नाहीत.

गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी अ‍ॅप विकसित
निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसावा व अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंदा नागरिकांना आॅनलाइन तक्रारी नोंदविण्यासाठी अ‍ॅप विकसित केले आहे. त्यावर नागरिकांच्या तक्रारी अधिक दाखल होत आहेत. मतदारसंघात आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती देण्यासाठी अ‍ॅपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो अपलोड करणे अपेक्षित आहे. तसेच आॅफलाइन तक्रारींची सुविधाही निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.
पथनाट्य, फेऱ्या या माध्यमांतून मतदारजागृती केली जात आहे. निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात, तसेच आॅनलाइन तक्रारी दाखल करण्यावर भर दिला आहे. पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत, उरण या विधानसभा मतदारसंघांत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आहे. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात सातव्या मजल्यावर कार्यालय सुरू
केले आहे.
सुरुवातीच्या कालखंडात खोट्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, त्यांची तपासणी काटेकोरपणे होत असल्याने दुसºया आणि महत्त्वाच्या टप्प्यात खोट्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. तपासणीमुळे खोट्या तक्रारदारांना चाप बसणार आहे.

Web Title: 241 complaints in violation of code of ethics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.