Mahad Flood: उलट्या-सुलट्या कार अन् विस्कटलेले संसार; महाडमध्ये पुरानंतर सगळंच अस्ताव्यस्त, पाहा PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 03:50 PM2021-07-23T15:50:22+5:302021-07-23T16:02:42+5:30

Mahad Flood: महाडमधील पूर हळूहळू ओसरू लागल्यानंतर या पुरानं झालेल्या नुकसानाचे विदारक दृश्य समोर येऊ लागलं आहे. या फोटोंमधूनच सारंकाही चित्र स्पष्ट होतंय...

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावासाचा फटका रायगड आणि रत्नागिरीला बसला आहे. रायगडमधील महाडमध्ये काल अनेक भागांमध्ये १० ते १२ फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. आज पाण्याचा निचरा झाला असून या पुरानं झालेल्या नुकसानाची ही विदारक दृश्य या परिसरात काय स्थिती निर्माण झाली होती याचं चित्र स्पष्ट करणारी आहेत.

महाडमध्ये अनेक ठिकाणी १० फुटापर्यंत पाणी साचलं होतं. या पाण्यात अनेक वाहनं वाहून गेली. अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

महाड शहरात जिथं पाहावं तिथं चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. पुराच्या पाण्यासोबत घरात आलेला गाळ बाहेर काढण्याचं मोठं संकट आता नागरिकांवर आलं आहे.

महाडमधील घराघरांमध्ये असा गाळ आणि कचरा शिल्लक राहिला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

महाड बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्येही पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे.

झाडं, वाहनं, मोटारसायकल असं सारंकाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं सारंकाही अस्ताव्यस्त झालं आहे.

काही ठिकाणी तर दुचाकी मूळ ठिकाणापासून दूर अंतरावर वाहून गेल्या आहेत. तर अनेक चारचाकी वाहनं एकमेकांवर अडकून पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

महाडमधील गल्लोगल्लीत असा गाळ साचलेला पाहायला मिळत आहे.

महाडमधील पुरानं केलेला हाहाकार आणि नुकसानाचं वास्तव या छायाचित्रांमधून स्पष्ट होतं.

पुराचं पाणी ओसरल्यानंतर आता गाळ, चिखर आणि कचरा साचून राहिल्यानं रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

Read in English