शिवसेना खासदाराच्या गाडीवर कोसळले झाड, गाडीचं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 02:46 PM2022-06-13T14:46:38+5:302022-06-13T14:58:59+5:30

राजधानी मुंबईत मान्सन पावसाने जोरदार हजेरी लावली असून शनिवारी आणि रविवारी वरुणराजाचे आगमन झाले. पावसाच्या या तडाख्यात वादळी वाऱ्याने काही झाडं उन्मळून पडल्याचे दिसून आले.

राजधानी मुंबईत मान्सन पावसाने जोरदार हजेरी लावली असून शनिवारी आणि रविवारी वरुणराजाचे आगमन झाले. पावसाच्या या तडाख्यात वादळी वाऱ्याने काही झाडं उन्मळून पडल्याचे दिसून आले.

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास परिसरातही झाडे पडली आहेत. त्यापैकी, एक झाड शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गाडीवर पडले.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार असून राज्यसभा निवडणुकांनिमित्त मुंबईत आले होते.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गाडीवर झाड कोसळून दुर्घटना घडली. सुदैवानेखासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गाडीवर झाड कोसळून दुर्घटना घडली. सुदैवाने झाड कोसळले तेव्हा गाडीत कोणीही नव्हते झाड कोसळले तेव्हा गाडीत कोणीही नव्हते

त्यामुळे, कुणीही जखमी झाल नाही. मात्र, गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासस्थानासमोर गाडी लावली असता ही दुर्घटना घडली.

ओमराजे हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव करुन ते खासदार झाले. तत्पूर्वी ते उस्मानाबादचे आमदार होते.