Swarajya Dhwaj: देशातील सर्वात मोठा 'स्वराज्य ध्वज' फडकला; शिवरायांच्या घोषांनी आसमंत दुमदुमला, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 03:40 PM2021-10-15T15:40:44+5:302021-10-15T15:54:14+5:30

Swarajya Dhwaj By Rohit Pawar: रोहित पवारांच्या संकल्पनेतून साकार झालेला भारतातील सर्वात मोठा 'स्वराज्य ध्वज' आज दसऱ्याच्या मुहूर्तावर फडकवण्यात आला.

रोहित पवारांच्या संकल्पनेतून साकार झालेला भारतातील सर्वात मोठा 'स्वराज्य ध्वज' आज दसऱ्याच्या मुहूर्तावर फडकवण्यात आला. देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज म्हणून या ध्वजाची ओळख झाली आहे.

७४ मीटर लांबीचा आगळा-वेगळा भगवा ध्वज देशातील सर्वात उंच भगवा ध्वज ठरला आहे.

स्वराज्यध्वज हा स्वराज्याचा, सर्व जातीधर्मांच्या लोकांचा ध्वज असून आपल्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी स्वराज्य ध्वज यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.

स्वराज्य ध्वज प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झालेलीय पाहायला मिळाली. मोठ्या थाटात अन् ढोल-ताशांच्या गजरात भगवा ध्वज फडकविण्यात आला.

निजामाविरूद्ध शिवरायांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावनभूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्ट्ण अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ला. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प रोहित पवार यांनी केला आहे.

स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना करण्याआधी या ध्वजाची महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, भारतातील ६ राज्ये, ७४ प्रेरणास्थळे असा महत्वाकांक्षी प्रवास करून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

तब्बल १२ हजार किलोमीटरचा प्रवास करून स्वराज्यध्वज पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात आला आणि आज शिवपट्ट्ण किल्ल्याच्या आवारात फडकविण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरु संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरात ध्वजाचे पूजन करण्यात आले होते.

कर्जत-जामखेड तालुक्याला नवी ओळख मिळवून देणारा हा स्वराज्य ध्वज अनेकांसाठी आता आदर्श प्रेरणा बनला आहे. महाराष्ट्राच्या शौर्यशाली परंपरेतून जन्मलेल्या, एकतेची-बंधुत्वाची हाक देणाऱ्या या ध्वजाची 74 मीटर अशी विक्रमी उंची आहे.