WTC Final 2021 IND vs NZ : ऐतिहासिक सामन्याचा पहिला दिवस वाया गेला, नेटिझन्सनी मीम्सचा पाऊस पाडला!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. एकही चेंडू न टाकता पहिला दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. इंग्लंडच्या लहरी हवामानाचा या सामन्याला फटका बसला अन् त्यावरून नेटिझन्सनी आता आयसीसीला झोडपायला सुरूवात केली आहे.