... म्हणून 'गब्बर'नं सात वर्षानं मोठी असलेल्या महिलेशी केलं लग्न

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवननं त्याच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठी असलेल्या आणि दोन मुलांची आई असलेल्या घटस्फोटीत महिलेशी लग्न केलं आहे.

शिखरने त्याच्याहून सात वर्ष मोठी असलेल्या महिलेशी लग्न का केले, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल

लहानपणापासून ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या आयशा मुखर्जीशी शिखरनं लग्न केलं

आयशाचे वडील बंगाली आणि आई ऑस्ट्रेलियन आहे. आयशाचा जन्म भारतात झाला. पण, लहानपणीच ती पालकांसह ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली.

आयशाला क्रिकेट आवडते आणि याच आवडीमुळे तिची ओळख शिखरशी झाली.

आयशा आणि शिखर फेसबुकवर मित्र बनले, त्यानंतर त्यांची भेट झाली आणि प्रेमकथा सुरू झाली.

धवन आणि आयशाने फेसबुकवर चॅटिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

शिखरने 2012 मध्ये आयशाशी लग्न केले.