महेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला!

Published: May 17, 2021 12:42 PM2021-05-17T12:42:10+5:302021-05-17T12:45:27+5:30

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानं गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता तो फक्त आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. त्याच्या नेतृत्वाखाली यंदाच्या आयपीएल स्पर्धेत CSKनं दमदार कामगिरी करून दाखवली, परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करावी लागली आहे.

मैदानावरील धोनीच्या कामगिरीला काहीच तोड नाही, पण मैदानाबाहेरही त्याची अनेकदा चर्चा रंगली आहे. लग्नापूर्वी त्याचं नाव बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यीशी जोडले गेले होते. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ही चर्चा रंगली होती, परंतु या दोघांकडून या वृत्ताला कधीच दुजोरा मिळाला नाही.

पण, धोनीचं दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबतही नावं जोडलं गेलं आणि त्याबाबत अभिनेत्रीनं मोठा खुलासा केला. या अभिनेत्रीचं नाव राय लक्ष्मी ( Raai Laxmi) असे आहे. तिनं जूली-२ व अकिरा या चित्रपटांत काम केलं आहे. याशिवाय तिनं ५०हून अधिक दाक्षिणात्य चित्रपटांत काम केलं आहे.

राय लक्ष्मी तिच्या बिनधास्त व ग्लॅमरस भूमिकेमुळे ओळखली जाते. तिचं आणि धोनी यांच्यात २००८मध्ये रिलेशन असल्याची चर्चा रंगली होती. ती चेन्नई सुपर किंग्स संघाची ब्रँड एम्बेसेडर होती. याच दरम्यान धोनी व तिची भेट झाली. धोनीनं मला प्रपोज केलं तर मी त्याच्याशी लग्न करेन, असं तिनं एका मुलाखतीत सांगितले होते.

तेव्हा धोनी बँगलोरला जातोय सांगून राय लक्ष्मीला भेटायला जायचा, अशीही चर्च होती. ओडिशा पोस्टच्या माहितीनुसार, धोनीच्या एका जवळच्या मित्रानं याबाबत सांगितले होते की, ४५ दिवसांत चार वेळा धोनी तेव्हा चेन्नईत गेला होता आणि तेव्हा तो राय लक्ष्मीलाच भेटला होता.

पण, या दोघांमधील नातं पुढे टिकू शकलं नाही आणि एका वर्षातच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. धोनीनं काही वर्षानंतर साक्षीसोबत लग्न केलं, तर राय लक्ष्मीचे तीन-चार अफेअर झाले होते. रायनं टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं होतं की,''धोनी आणि माझ्या नात्याचा हा असा डाग आहे की तो आयुष्यभर सोबतच राहिल. प्रत्येकवेळी लोकं भूतकाळात जाऊन आमच्या नात्याची चर्चा करतात.

राय लक्ष्मी हिचं नाव भारताचा गोलंदाज एस श्रीसंत याच्याशीही जोडले गेले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English