इन आँखों की मस्ती के...!; रेखा अन् इम्रान खान लग्न करणारच होते, पण...

Published: May 11, 2021 02:12 PM2021-05-11T14:12:36+5:302021-05-11T14:17:20+5:30

बॉलिवूड अभिनेत्री व क्रिकेटपटू हे नातं गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. त्यातील काही नाती जगासमोर आली, तर काही नाती ही पडद्यामागेच राहिली.

बॉलिवूड अभिनेत्री व क्रिकेटपटू हे नातं गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. त्यातील काही नाती जगासमोर आली, तर काही नाती ही पडद्यामागेच राहिली.

पाकिस्तानचा माजी कर्णधार व सध्याचे पंतप्रधान इम्रान खान आणि बॉलिवूड अभिनेत्रत्री रेखा यांची लव्हस्टोरी समोर येत आहे. (former Pakistan captain and current Prime Minister Imran Khan was involved with Bollywood actress Rekha)

इम्रान खान क्रिकेट खेळत असताना तरुणींमध्ये त्यांची फार क्रेझ होती. त्याचे अनेक महिलेंसोबत नाव जोडले गेलेत आणि त्यापैकी एक नाव म्हणजे रेखा. काही वृत्तपत्रांच्या वृत्तानुसार रेखाच्या आईनंही या नात्याला होकार दिला होता.

रेखा व इम्रान ही दोघं लग्नही करणार होती, असेही वृत्त तेव्हा पसरले होते. रेखाची आई एवढी आनंदी होती की या दोघांच्या पत्रिका जुळाव्यात म्हणून त्या ज्योतिषीकडेही गेल्या होत्या.

रेखा व इम्रान यांनी मुंबईत एकमेकांसोबत वेळही घालवल्याचे वृत्त होते. इम्राननं संपूर्ण एप्रिल महिना मुंबईत घालवला होता. या कालावधीत रेखा व इम्रान हे नाईट क्लब व समुद्रचौपाटी वर दिसले होते.

पण, वृत्तपत्रात छापून आलेल्या वृत्तात इम्रान यांनी रेखासोबतच्या डेगिंच्या बातम्या खऱ्या असल्याचे मान्य केले, परंतु तिच्यासोबत लग्न करण्याचा विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

इम्रान खान यांच नाव जिनत अमान व शबाना आझ्मी यांच्यासोबतही जोडले गेले होते. १९९२ मध्ये इम्राननं निवृत्ती घेतली. रेखानं कधीच या नात्याबद्दल चर्चा केली नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!