Team-wise match fees : भारतीय खेळाडूंना मिळते सर्वाधिक मॅच फी?, उत्तर जाणून तुम्हाला बसेल धक्का

Team-wise match fees paid in all formats of the game जगभरातील सर्व क्रिकेट संघटना त्यांच्या खेळाडूंना करारबद्ध करते. त्यानुसार खेळाडूंना मॅच फी दिली जाते. काही क्रिकेट बोर्ड त्यांच्या खेळाडूंना मोठा पगार देत आहेत, तर काही फार कमी. बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा आहे. पण, मॅच फी मध्ये भारतीय खेळाडू अव्वल स्थानावर नाहीत. हे जाणून धक्का बसला ना..

इंग्लंड ( England) - इंग्लंडच्या खेळाडूंना सर्वाधिक 18.5 लाख रुपये प्रती कसोटी सामन्याला दिली जाते. वन डे व ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यासाठी अनुक्रमे 10 व 5.1 लाख रुपये मॅच फी दिली जाते.

ऑस्ट्रेलिया ( Australia ) - ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना एका कसोटी सामन्यासाठी 11 लाख मॅच फी दिली जाते. वन डे क्रिकेटसाठी 8.5 लाख, तर ट्वेंटी-20साठी 5.6 लाख दिले जातात.

पाकिस्तान ( Pakistan) - पाकिस्तानी खेळाडूंना एका कसोटीसाठी 3.6 लाख रुपये दिले जातात. वन डे व ट्वेंटी-20 साठी प्रती सामना अनुक्रमे 2.2 लाख व 1.6 लाख मॅच फी त्यांना मिळते.

बांगलादेश (Bangladesh) - कसोटी सामन्यासाठी 2.6 लाख रुपये मॅच फी, वन डे व ट्वेंटी-20 सामन्यासाठी अनुक्रमे 1.7 लाख व 1 लाख मॅच फी..

दक्षिण आफ्रिका ( South Africa) - क्रिकेट दक्षिण आफ्रिका एका कसोटीसाठी खेळाडूंना 3.3 लाख मॅच फी देतात. वन डेसाठी 87 हजार आणि ट्वेंटी-20 साठी 58 हजार मॅच फी

न्यूझीलंड ( New Zealand) - न्यूझीलंडच्या खेळाडूंना एका कसोटीसाठी 4.5 लाख रुपये मॅच फी दिली जाते. वन डे व ट्वेंटी-20साठी एका सामन्याला त्यांना अनुक्रमे 2 लाख व 1.3 लाख मिळतात.

श्रीलंका ( Sri Lanka) - श्रीलंकेचे खेळाडू सध्या करारावरून अडून बसले आहेत आणि करारावर स्वाक्षरी न करताच ते इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांना एका कसोटीसाठी 5.5 लाख रुपये मॅच फी मिळते. वन डे व ट्वेंटी-20साठी अनुक्रमे 1.5 लाख व 2.5 लाख मिळतात.

भारत ( India) - एका कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडूला 15 लाख, वन डे साठी 6 लाख आणि ट्वेंटी-20 साठी 3 लाख मॅच फी दिली जाते.