टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...

Team India's sponsor History: टीम इंडियाला स्पॉन्सर केलेल्या कंपन्यांपैकी तीन कंपन्या या एकतर बंद पडल्या आहेत किंवा दिवाळखोर झाल्या आहेत. सर्वांनाच ते फळले नाही.

टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला आहे. ऑटो क्षेत्राला टायर पुरविणारी देशातील सर्वात मोठ्या टायर कंपन्यांपैकी एक अपोलो टायर्सने टीम इंडियाला स्पॉन्सर केले आहे. ड्रीम ११ वर बंदी आल्यानंतर बीसीसीआय नव्या स्पॉन्सरच्या शोधात होती.

अपोलो टायर्स प्रत्येक मॅचसाठी बीसीसीआयला ४.५ कोटी रुपये देणार आहे. ड्रीम ११ चार कोटी रुपये देत होती. २०२७ पर्यंत अपोलोसोबत करार झाला असून या काळात टीम इंडिया १३० मॅच खेळणार आहे.

टीम इंडियाला स्पॉन्सर केलेल्या कंपन्यांपैकी तीन कंपन्या या एकतर बंद पडल्या आहेत किंवा दिवाळखोर झाल्या आहेत.

टीम इंडियाला सहारा, स्टार इंडिया, ओप्पो, बायजू आणि नंतर ड्रीम ११ ने स्पॉन्सर केले होते. परंतू, सर्वांनाच ते फळले नाही.

टीम इंडियाला सर्वाधिक काळ सहाराने स्पॉन्सर केले होते. आता सहारा कंपनी पश्चिम बंगालमधील घोटाळ्यामुळे संपली आहे.

दुसरी कंपनी बायजू, ही कंपनी देखील दिवाळखोरीत निघाली आहे. बायजू ही ऑनलाईन क्लासेस घेणारी कंपनी होती. कोरोना काळात ती फुल फॉर्ममध्ये आली होती.

तिसरी बंद पडलेली कंपनी ही ड्र्रीम ११ आहे. बेटिंग अॅपद्वारे या कंपनीने बक्कळ पैसा कमावला आहे. परंतू, केंद्र सरकारने बेटिंग अॅपवर बंदी आणली आणि ही कंपनी आता बंद पडली आहे.

स्टार इंडियाने देखील काही वर्षे टीम इंडियाच्या जर्सीवर आपले नाव कोरले होते. ही एक टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स क्षेत्रातील कंपनी आहे.