सौंदर्य अन् फिटनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींवरही भारी पडतेय 'ही' टीम इंडियाची खेळाडू!

भारतीय महिला क्रिकेट संघानं या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

यजमान ऑस्ट्रेलियाकडून त्यांना हार पत्करावी लागली असली तरी भारतीय संघाच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केलं.

या कामगिरीनं भारतीय संघातील खेळाडूंना स्टार बनवलं. याच संघातील यष्टिरक्षक - फलंदाज तानिया भाटियानं सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मैदानावरील कामगिरीच्या जोरावर तिनं जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षकांमध्ये स्थान पटकावलं आहे. पण, खेळाबरोबरच तिच्या सौंदर्याची आणि फिटनेसनं सर्वांना चकित केलं आहे.

28 नोव्हेंबर 1997मध्ये चंडीगढ येथे जन्मलेल्या तानियानं कमी वयातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

2018मध्ये तिनं वयाच्या 22व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तानियाचे वडील संजय भाटिया यांनी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्तरावर क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे.

शालेय स्तरावर तिला भारताचा फलंदाज युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी प्रशिक्षण दिले.

तानियानं वयाच्या 11व्या वर्षीच पंजाबच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं आणि ती सर्वात युवा खेळाडू होती.

क्रिकेटसोबतच तिचं प्राण्यांवरही विशेष प्रेम आहे. 13व्या वर्षी तिनं आंतरराज्य स्थानिक स्पर्धेत पंजाबच्या वरिष्ठ संघात स्थान पटकावले. अशी कामगिरी करणारी ती सर्वात युवा खेळाडू होती.

2015च्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेत तिनं उत्तर विभागाच्या संघाचे नेतृत्व सांभाळले होते. तियनं 227 धावा करताना 10 बळी टिपले.