IPL 2021, SRH vs KKR: आज कोण जिंकणार?, कोलकाता की हैदराबाद?, वाचा इतिहास काय सांगतो...

SRH vs KKR IPL 2021 Head To Head Records : आयपीएलमध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद अशी लढत होतेय. दोन्ही संघ एकदम तगडे आहेत. कोण मारेल आज बाजी?

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला आज तिसरा सामना चेन्नईत होत आहे. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होत आहे.

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील दोन्ही संघांमधील हा 20 वा सामना असेल. परंतु, या सामन्यात कोण जिंकणार हे जाणून घेण्यासाठी दोन्ही संघांमधील शेवटच्या 19 सामन्यांचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.

आयपीएलमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत १९ वेळा एकमेकांना भिडले आहेत. यात केकेआरची बाजू उजवी ठरली आहे. कोलकात्याने १२ सामने जिंकले आहेत तर हैदराबादने केवळ ७ सामने जिंकले आहेत.

भारतात झालेल्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता आणि हैदराबाद आयपीएलच्या १७ सामन्यांमध्ये आमने सामने आले आहेत. यापैकी ७ सामन्यांमध्ये हैदराबादने विजय मिळवला आहे, तर १० सामन्यांमध्ये कोलकात्याने विजय मिळवला आहे.

आयपीएलच्या गेल्या मोसमात दोन्ही संघ एकमेकांना दोनदा भिडले आणि दोन्ही वेळेस केकेआरने हैदराबादला पराभूत केलं आहे.

कोलकाता विरुद्ध हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ६१६ धावा केल्या आहेत आणि भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक १९ विकेट घेतल्या आहेत.

कोलकाताकडून शुबमन गिल यानं हैदराबादविरुद्ध सर्वाधिक ४४० धावा केल्या आहेत तर कुलदीप यादव आणि सुनील नरेन यांनी सर्वाधिक १० बळी घेतले आहेत.

हैदराबादचा केकेआर विरुद्ध सर्वाधिक स्कोअर २०९ इतका आहे. तर केकेआरचा सर्वाधिक स्कोअर १८३ इतका राहिला आहे. सर्वात कमी स्कोअर केकेआरचा १०१ इतका राहिलाय. तर हैदराबादचा सर्वात कमी स्कोअर १२८ इतका होता.

कोलाकाता नाइट रायडर्सला संघात समतोल साधणं खूप कठीण होऊन बसलं आहे आणि हीच संघाची सर्वात कमकुवत बाजू राहिली आहे. तर हैदराबादच्या संघात विदेशी खेळाडूंना सूर गवसणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.

केकेआरची मजबूत बाजू म्हणजे शुभमन गिलच्या रूपाने आघाडीच्या फळीत शानदार फलंदाज.राहुल त्रिपाठी, नितीश राणा व अनुभवी दिनेश कार्तिकच्या रूपाने चांगले भारतीय फलंदाज आहे. या व्यतिरिक्त मॉर्गन कुठल्याही आक्रमणाविरुद्ध धावा फटकावण्यास सक्षम.

हैदराबादकडे वेगवान गोलंदाज भुवनेश्वरच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी मजबूत. यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनचाही संघात समावेश आहे. त्यात स्वत: कर्णधार डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅपचा बहुमान पटकावणारा खेळाडू आहे.