'या' पाच निकषांवर झाले शास्त्री प्रशिक्षक

1. प्रशिक्षण कौशल्य : संघाला तुम्ही कसे आणि काय प्रशिक्षण देता. त्यामध्ये किती व्यावसायिक गोष्टींचा समावेश असतो. प्रशिक्षणाचा दर्जा नेमका कसा आहे आणि आपले प्रशिक्षण अन्य संघांपेक्षा चांगले कसे ठरते, हे यामध्ये पाहिले जाते.

२. अनुभव : आतापर्यंत तुम्हाला एक खेळाडू म्हणून खेळाचा आणि प्रशिक्षणाचा किती अनुभव आहे. तुमच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी तुम्ही संघाला मिळवून दिल्या आहेत.

३. यश : तुम्ही प्रशिक्षक असताना संघाला किती यश मिळाले. कोणत्या क्षेत्रात संघ यशस्वी ठरला. आतापर्यंतच्या या यशामध्ये काय वेगळेपणा होता.

४. बांधिलकी : तुमची संघाबरोबर किती बांधिलकी आहे आणि संघासाठी तुम्ही काय करू शकता.

५. संवाद : संघातील खेळाडूंबरोबर तुमचा कसा संवाद आहे. संघाला किंवा क्रिकेट मंडळाबरोबर तुमचा संवाद कसा आहे. त्याचबरोबर निवड समिती आणि मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर तुम्ही कसा व्यवहार ठेवता.