Corona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीडापटूंना सांगितले 'पाच' मंत्र, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशभरातील क्रीडापटूंशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी क्रीडापटूंकडे कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचं आवाहन केलं.

खेळाडूंमुळे देशाला अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाले, आता त्यांना देशवासीयांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे आणि मनोधैर्य वाढवायचे आव्हान पेलावं लागेल, असे मोदींनी सांगितले.

त्यांनी जास्तीत जास्त लोकांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचं आवाहन केलं. मोदींना 40 हून अधिक क्रीडापटूंशी संवाद साधला.

यावेळी मोदींनी क्रीडापटूंना पाच मंत्र लोकांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली.

संकल्प - कोरोना व्हायरशी मुकाबला करण्याचा

संयम - सोशल डिस्टंसिंगचा

सन्मान - डॉक्टर, नर्स, पोलीस इत्यादिंचा

सकारत्मकता - लोकांमध्ये सकारात्मक वातावरण ठेवा

सहकार्य - देशाच्या मदतीसाठी पंतप्रधान निधीत आपापल्या परीनं मदत करा

मोदींची यावेळी पी व्ही सिंधू, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी आदींसह 40 खेळाडूंना हा मंत्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.