खरंच मोटेरा जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे? जाणून घ्या सत्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये खणखणीत भाषण केलं.

जगातील सर्वात मोठं स्टेडियम म्हणून ट्रम्प यांनी मोटेरा येथे नव्यानं उभ्या राहिलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमची ओळख करून दिली.

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामुळे लाखो लोकांना नव्यानं तयार करण्यात आलेले भव्य स्टेडियम पाहण्याची संधी मिळाली. मोटेरा स्टेडियमची भव्यता डोळे दिपवून टाकणारी ठरली.

1 लाख 10 हजार प्रेक्षकक्षमता असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असल्याचा केला जाणारा दावा, खरंच सत्य आहे का?

मोटेरा हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे, परंतु हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम नाही. हा मान उत्तर कोरियातील स्टेडियमला जातो.

उत्तर कोरियातील रनग्रॅडो मे डे हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 1 लाख 50 हजार इतकी आहे.

विकिपीडीयाने या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 1 लाख 14 हजार असल्याचा दावा केला आहे.

त्याचा उपयोग मीलिटरी परेड किंवा अन्य स्पर्धांसाठी केला जात आहे.

विशेष म्हणजे हे स्टेडियम बेटावर उभारण्यात आले आहे.

1 मे 1989 मध्ये हे स्टेडियम खुलं करण्यात आले. 51 एकर इतका या स्टेडियमचा विस्तार आहे.

या स्टेडियमवर फुटबॉल, अॅथलेटिक्सही खेळवण्यात येतात. 1989मध्ये युवा आणि विद्यार्थ्यांचा जागतिक महोत्सव हा सर्वात मोठ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.