वन डेत जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजानं केलं प्रेयसीला हटके प्रपोज

बॉलिवूड चित्रपटाची भूरळ ही केवळ भारतापूरती मर्यादित नाही. जगभरात बॉलिवूड चित्रपटांनी आपला चाहता निर्माण केला आहे. त्यात क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं वेगळ सांगण्याची गरज नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघातील माजी क्रिकेटपटूनं त्याच्या प्रेयसीला बॉलिवूड स्टाईलनं प्रपोज केले आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या क्रिेकेटपटूचं नाव कोरे अँडरसन असे आहे. न्यूझीलंडचा हा अष्टपैलू खेळाडू आपल्या आक्रमक खेळीनं ओळखला जातो.

2013-14मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावून अँडरसन प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानं 36 चेंडूंत हे शतक झळकावले होते.

त्याचा हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनं ( 31 चेंडू वि. वेस्ट इंडिज) मोडला.

अँडरसननं नुकतेच त्याची प्रेयसी मेरी मार्गारेट शॅमबर्गरला लग्नासाठी मागणी घातली.

एका उंच ठिकाणी गुडघ्यावर बसून त्यानं तिला प्रपोज केलं आणि त्यांचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.