IPL मधील २० षटकं, पण कोणत्या षटकात कुणी केल्यात सर्वाधिक धावा? रोहित शर्माचं नावचं नाही

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्यातून सुरुवात होणार आहे. आयपीएल म्हटलं की धावांचा पाऊस पडायलाच हवा. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप फाईव्ह फलंदाजांत विराट कोहली - ५८७८ धावा, सुरेश रैना - ५३६८ धावा, डेव्हिड वॉर्नर - ५२५४ धावा, रोहित शर्मा - ५२३० धावा, शिखर धवन - ५१९७ धावा हे खेळाडू आहेत. आज आपण आयपीएलमधील प्रत्येक षटकात कुणाच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत, हा हटके विक्रम पाहणार आहोत. ( Most Runs in each over of Indian Premier League)

पहिले षटक - डेव्हिड वॉर्नर - ३८९ धावा

दुसरे, तिसरे व चौथे षटक - शिखर धवन ( ४८४, ५३८ व ४४२ धावा)

पाचवे व सहावे षटक - डेव्हिड वॉर्नर ( ४६६ व ४३९ धावा)

सात, आठ, नऊ, दहा व ११ वे षटक - सुरेश रैना ( ३११, ३४७, ३५६, ३५७ व ३७७ धावा)

१२ व १३वं षटक - विराट कोहली ( ३५३ व ३२७ धावा)

१४ वे षटक - दिनेश कार्तिक - ३६२ धावा

१५ ते २० वे षटक - महेंद्रसिंग धोनी ( ४३८, ४६६, ५५७, ५६८, ५८६ व ५९२ धावा)