Photo : 9 महिन्यांपूर्वी पत्नीला दिला घटस्फोट; आता एका मुलाच्या आईच्या प्रेमात पडला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू!

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2019मध्ये सप्टेंबर महिन्यात त्यानं पहिली पत्नी कायली क्लार्क हिच्याशी घटस्फोट घेतला होता.

क्लार्क आणि कायली यांनी 2012मध्ये लग्न केलं आणि त्यांना चार वर्षांची केलसी ली ही मुलगी आहे.

मायकेल क्लार्क आणि त्याची पत्नी कायली यांनी सात वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला.

ऑसी दिग्गजाचा हा घटस्फोट वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. हा घटस्फोट 192 कोटींना पडल्याचे वृत्त एका ऑस्ट्रेलियन वेबसाईटनं दिलं आहे.

सीडनी वेस्टफिल्ड स्पोर्ट्स हायस्कूलमध्ये विद्यार्थी म्हणून 1990मध्ये क्लार्क आणि कायली यांची पहिली भेट झाली. पण, त्यानंतर क्लार्क आणि प्रसिद्ध मॉडल लारा बिंगल यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या.

क्लार्क आणि बिंगल यांची 2007मध्ये भेट झाली. त्यांच प्रेमप्रकरण आठ वर्ष टिकलं. बिंगल हीचे तिच्या Ex बॉयफ्रेंड सोबतचे नग्न फोटो व्हायरल झाल्यानंतर क्लार्कनं तिच्याची ब्रेक अप केलं.

आता क्लार्क पुन्हा प्रेमात पडला आहे आणि पिप एडवर्ड्स असे त्याच्या नव्या प्रेयसीचं नाव आहे. ही दोघं सध्या सोबत फिरायला गेली आहेत आणि सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

पिप एडवर्ड्स हिला पहिल्या पतीपासून 13 वर्षांचा मुलगा आहे. कायलीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर क्लार्क अन् पिप एकमेकांना डेट करू लागले.

पण, या दोघांनी कधीच त्याची जाहीर कबुली दिली नव्हती, परंतु आता त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत आणि पिपनं हे नातं मान्य केलं आहे.

मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं 2015मध्ये पाचव्यांदा वन डे वर्ल्ड कप जिंकला. त्यानं 115 कसोटी, 245 वन डे आणि 34 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत मिळून 17000 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा सर्वात उत्तम फलंदाज म्हणून क्लार्क ओळखला जातो. त्यानं 2015मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.