Game Changing Moment : मयांक अग्रवालची सुपर डाईव्ह!; मुंबई इंडियन्सला 'या' चुका पडल्या महागात

Published: October 19, 2020 07:31 AM2020-10-19T07:31:00+5:302020-10-19T07:35:01+5:30

MI vs KXIP Latest News : दोन गुणांच्या महत्वाच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) पूर्ण जीव ओतून खेळ केला. फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) चा विजयरथ अडवून पंजाबनं स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे.

लोकेश राहुलच्या दमदार खेळीनंतरही पंजाबला बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये मोहम्मद शमीनं मुंबई इंडियन्सला बरोबरीत रोखले.

किंग्स इलेव्हन पंजाबने ( Kings XI Punjab) सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) रोखून सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये नेला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी मुंबई इंडियन्सला १ बाद ११ धावा करून दिल्या. KXIPच्या ख्रिस गेलनं पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला त्यानंतर एक धाव व मयांक अग्रवालनं चौकार खेचला. पुन्हा एक चौकार खेचून त्यानं पंजाबचा विजय पक्का केला.

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. क्विटन डी'कॉकनं ४३ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा किरॉन पोलार्डनं अखेरच्या षटकांत धावा कुटल्या. पोलार्डनं १२ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३४ आणि कोल्टर-नायलनं १२ चेंडूंत २४ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं ६ बाद १७६ धावा केल्या.

प्रत्युत्तरात ख्रिस गेल २४ धावा ( १ चौकार व २ षटकार) व निकोलस पूरन १२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २४ धावांवर माघारी परतले. ग्लेन मॅक्सवेलचा ( ०) अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. राहुल चहरनं त्याला बाद केले.

१८ व्या षटकात जसप्रीत बुमराहनं सामना फिरवला. त्यानं लोकेश राहुलचा त्रिफळा उडवला. लोकेशनं ५१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७७ धावा केल्या. दीपक हुडाचे दोन झेल सोडणं मुंबई इंडियन्सला महागात पडलं. अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी ९ धावांची गरज असताना ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर हुडाचा झेल सुटला. पण, पंजाबला १ धावेवर समाधान मानावे लागले. बोल्टनं पंजाबला ५ बाद १७६ अशा बरोबरीत रोखून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.

Super Overमध्ये प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबला जसप्रीत बुमराहनं ५ धावांवर रोखलं. पण, मोहम्मद शमीनंही टिच्चून मारा करताना मुंबई इंडियन्सला ५ धावा करू दिल्या.

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सकडून किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या मैदानावर उतरले. ख्रिस जॉर्डननं दोन वाइड बॉल टाकून मुंबईच्या धावसंख्येत वाढ केली. पण, अखेरच्या चेंडूवर पोलार्डनं टोलावलेला चेंडू अडवून मयांक अग्रवालनं संघासाठी चार धावा वाचवल्या. हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला अन् मुंबईला 1 बाद 11 धावांवर समाधान मानावे लागले.

ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून ख्रिस गेलनं पंजाबवरील दडपण हलकं केलं. त्यानंतर मयांक अग्रवालनं दोन चौकार खेचून पंजाबचा विजय पक्का केला.

निर्धारित षटकांत लोकेश राहुलला बाद केल्यानंतर दीपक हुडाचे दोन झेल अनुक्रमे राहुल चहर व नॅथन कोल्टर-नायर यांनी सोडला. त्यात चहरसाठीचा झेल सोपा होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!