वाढदिवसाला जसप्रीत बुमराहला Kiss करताना दिसली संजना; MIचा गोलंदाजाच्या पोस्टनंतर जिमी निशॅमनं केलं ट्रोल!

Published: May 6, 2021 02:02 PM2021-05-06T14:02:05+5:302021-05-06T14:04:44+5:30

जसप्रीत बुमराह व संजन यांनी १५ मार्चला गोव्यात लग्न केलं. लग्नसाठी बुमराहनं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून व ट्वेंटी-२० मालिकेतून सुट्टी घेतली होती.

भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं पत्नी व स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संजनाला शुभेच्छा देताना बुमराहनं त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली.

जसप्रीत बुमराह व संजन यांनी १५ मार्चला गोव्यात लग्न केलं. लग्नसाठी बुमराहनं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून व ट्वेंटी-२० मालिकेतून सुट्टी घेतली होती.

त्यानं संजनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना फोटो पोस्ट केला. त्यात संजना त्याच्या गालावर Kiss करताना दिसत आहे. त्यावर बुमराहनं लिहिलं की, माझं हृदय रोज जिंकणाऱ्या त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तु माझी आहेस, आय लव्ह यू!

लग्नानंतर जसप्रीत बुमराह व संजना गणेशन इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वासाठी आपापल्या कर्तव्यावर परतले. जसप्रीत मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे, तर संजना ही स्टार स्पोर्ट्सची प्रेझेंटर आहे.

संजनाचा जन्म ६ मे १९९१ रोजी पुणे शहरात झाला. शालेय शिक्षण बिशप शाळेमध्ये झाले. त्यानंतर सिम्बॉयसिसमधून बी.टेक. पूर्ण केले. सिम्बॉयसिसमध्ये असताना संजनाने सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर संजना आयटी आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्राकडे वळली. त्याचवेळी अँकर म्हणून काम करायला सुरुवात केली.

संजना गणेशन ‘स्प्लिट्स व्हिला ७’ या रिएलिटी शोमध्ये दिसली होती. या शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडेल होती. संजनाने ‘फेमिना ऑफिशियली गॉर्जियस’ हा किताब जिंकला आहे. त्यानंतर २०१२ मध्ये तिने ‘फेमिना स्टाईल दिवा’मध्ये भाग घेतला होता.

२०१४ मध्ये संजना ‘फेमिना मिस इंडिया पुणे’ या स्पर्धेची फायनलिस्ट होती. स्पोर्ट्‌स अँकर संजनाने २०१९ मध्ये क्रिकेट विश्वचषकात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर ‘मॅच पॉईंट’ शोचे सूत्रसंचालन केले होते. स्टार स्पोर्ट्सचा ती ‘फेमस’ चेहरा बनली आहे. आयपीएलमध्ये संजना कोलकाता नाईट रायडर्स संघाशी जुळली आहे. केकेआरचा शो ती स्वत: संचालित करते.

बुमराहने २०१६ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तो १९ कसोटी, ६७ वन डे आणि ४९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. बुमराहच्या पोस्टनंतर मुंबई इंडियन्सचा सदस्य जिमी निशॅम यानं ट्रोल केलं. थोड्यावेळासाठी मला असं वाटलं की तू ट्रेंट बोल्टबद्दल बोलत आहेस.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!