रिषभ पंत बनला 'हिरो'; जाणून घ्या शिखर धवनसह संघातील खेळाडूंना मिळाले कोणते चित्रपट!

लॉकडाऊनच्या काळात क्रिकेट स्पर्धा बंद झाल्या आहेत. इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार असली तरी भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कधी परतेल, याबाबत अद्याप सांगणं अवघड आहे.

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटपटूंना घरीच बसावे लागले आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळाडू एकमेकांशी आणि चाहत्यांशी संवाद साधत आहेत.

पण, सोशल मीडियावर शिखर धवन, रिषभ पंत यांच्यासह अनके क्रिकेटपटूंच्या चित्रपटांचे पोस्टर व्हायरल होत आहेत. काय आहेत यामागचं सत्य..

दिल्ली कॅपिटल्स संघाच्या ट्विटर हँडलवर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरनं संघातील कोणत्या खेळाडूसाठी कोणता चित्रपट सूट होईल याची माहिती दिली. त्यावरून दिल्ली कॅपिटल्नने हे फोटो व्हायरल केले आहेत.

संघाचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडाला फास्ट अँड फ्युरियस या चित्रपटात दाखवला आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंग हॉलिवूडच्या गॉडफादर चित्रपटाच्या पोस्टवर दिसत आहे.

शिखर धवन हा अक्षय कुमारच्या गब्बर या चित्रपटात दिसत आहे.

टीमचा यष्टिरक्षक रिषभ पंत पॉवरपंती या चित्रपटाच्या पोस्टवर दिसत आहे.