IPL Cheerleaders Salaries :मुंबई इंडियन्स अन् KKR चीअर लीडर्सना द्यायचे सर्वाधिक पगार; मॅच जिंकल्यावर मिळायचा 6500 रुपयांचा बोनस!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 05:02 PM2021-07-22T17:02:14+5:302021-07-22T17:06:37+5:30

आयपीएलच्या एका पर्वात लाखो कमवायच्या चीअर लीडर्स; मॅच जिंकल्यावर मिळायचा 6500 रुपयांचा बोनस! IPL: Salaries of Cheerleaders of every team

इंडियन प्रीमिअर लीगमुळे ( Indian Premier League) अनेक युवा खेळाडूंना त्यांची गुणवत्ता दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ मिळालं. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आदी खेळाडू टीम इंडियाला आयपीएलच्या व्यासपीठावरूनच मिळाले. बक्कळ पैसा, अमाप प्रसिद्धी अन् स्टायलिश लाईफ, हे आयपीएलमुळेच भारतीय क्रिकेटपटूंच्या आयुष्यात आले. आयपीएलच्या एका पर्वातून मिळणाऱ्या उत्पन्नावर बीसीसीआयही स्थानिक क्रिकेटपटूंचा आर्थिक प्रश्न सोडवतेय.

याच आयपीएलमध्ये पूर्वी चीअर लीडर्सची दिसायच्या आणि त्यांनाही आयपीएलनं आर्थिक सुबकता दिली. आयपीएलच्या एका पर्वात प्रतीसामना 6 ते 12 हजार रुपये या चीअऱ लीडर्स कमवायच्या काही संघ तर सामना जिंकल्यानंतर त्यांना 6500 पर्यंतची बोनस रक्कमही द्यायचे.. जाणून घेऊया कोणता संघ चीअर लीडर्सना किती पगार द्यायचा...

GMR ग्रुपने दिल्ली कॅपिटल्स संघ खरेदी केला आहे आणि अद्याप त्यांना एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. 2020मध्ये यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं अंतिम फेरीत मजल मारली होती. ते त्यांच्या चीअर लीडर्सना प्रतीसामना 9700 रुपये द्यायचे,, म्हणजेच त्या चीअर लीडर्सचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख एतके असायचे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेला चेन्नई सुपर किंग्स चीअर लीडर्सना एका सामन्यासाठी 10 हजार रुपये द्यायचे.

2016 साली आयपीएल जेतेपद पटाकवणारा हा संघ चीअर लीडर्सना प्रती सामना 9.5 ते 10 हजार द्यायचे.

किंग्स इलेव्हन पंजाब ( आताचे पंजाब किंग्स) हे चीअर लीडर्सना 9500 रुपये प्रती सामना द्यायचे.

प्रती सामना 11500 ते 12 हजार एवढे मानधन प्रती सामना राजस्थान रॉयल्सकडून चीअर लीडर्सना दिले जायचे

आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ मुंबई इंडियन्स चीअर लीडर्सना प्रतीसामना 16 हजार द्यायचे अन् संघ सामना जिंकल्यावर 6500 बोनस मिळायचा.

RCB चीअर लीडर्सना प्रती सामना 6.4 ते 6.8 हजार द्यायचे आणि संघ मॅच जिंकल्यावर 50 डॉलरचा बोनस वेगळा

20 हजार प्रती सामना मानधन अन् संघ मॅच जिंकल्यावर 6500चा बोनस

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!