Rohit Sharma Virat Kohli, IPL 2025: रोहितची Mumbai Indians हरली, विराटच्या RCBचं टेन्शन वाढलं... पाहा IPL Playoffsचं नवं गणित

Mumbai Indians RCB Playoffs Scenario: मुंबई इंडियन्सने पंजाबला हरवलं असतं तर समीकरण वेगळं असतं...

IPL 2025 मध्ये सोमवारी मुंबई आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या पंजाबने हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला.

मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमारच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, प्रियांश आर्य आणि जोश इंग्लिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाबने सामना सहज जिंकला.

या विजयासह पंजाब किंग्ज १९ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला. मुंबईला मात्र चौथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले त्यांचे टॉप-२चे स्वप्न भंगले. पण या सामन्यानंतर प्लेऑफ समीकरणात मोठा बदल झाला.

जे ४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत, त्यात पंजाब किंग्ज १९ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर गुजरात टायटन्स १४ सामन्यांत १८ गुणांसह दुसऱ्या स्थानी, RCB १३ सामन्यांत १७ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

मुंबईचा पराभव झाल्याने त्यांचे १४ सामन्यांत १६ गुण आहेत. म्हणजेच प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या ३ संघांनी त्यांचे १४-१४ लीग सामने खेळले आहेत. आता फक्त RCB संघाचा एक सामना शिल्लक आहे.

RCB ने मंगळवारी लखनौला हरवले तर त्यांचे १९ गुण होतील आणि ते टॉप-२ मध्ये येतील, तर गुजरात आणि मुंबई तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असतील आणि एलिमिनेटर खेळतील.

पण जर RCB ने हा सामना गमावला तर ते तिसऱ्या स्थानावर राहील आणि त्यांना मुंबई इंडियन्सविरूद्ध करो वा मरोचा सामना खेळावा लागेल. मुंबईने पंजाबला हरवले असते तर समीकरण काहीसे वेगळे असते.

पण जर RCB ने हा सामना गमावला तर ते तिसऱ्या स्थानावर राहील आणि त्यांना मुंबई इंडियन्सविरूद्ध करो वा मरोचा सामना खेळावा लागेल. मुंबईने पंजाबला हरवले असते तर समीकरण काहीसे वेगळे असते.