IPL 2021 : सुरेश रैनाची माघार ते सुनील गावस्कर यांची अनुष्का शर्मावरील वादग्रस्त कमेंट; IPL 2020मधील मोठे वाद!

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. पण, आयपीएल म्हटलं की वाद आलेच आणि प्रत्येक पर्व कोणत्या ना कोणत्या वादानं गाजतंच... The Biggest Controversies From IPL 2020

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. पण, आयपीएल म्हटलं की वाद आलेच आणि प्रत्येक पर्व कोणत्या ना कोणत्या वादानं गाजतंच... यंदा कोरोना व्हायरसमुळे सहा शहरांमध्येच आयपीएलचे सामने खेळवण्यात येत आहेत आणि त्यामुळे संघांना घरच्या मैदानावर खेळण्यास मिळणार नाही. शहरांच्या निवडीवरूनही वाद झाला आणि काही फ्रँचायझींनी बीसीसीआयला पत्र लिहिले. पण, मागच्या वर्षी यूएईत झालेल्या आयपीएल २०२०तील पाच मोठ्या वादांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

सुरेश रैनाची स्पर्धेतून माघार ( RAINA PULLS OUT OF THE TOURNAMENT) - आयपीएलच्या १३व्या पर्वासाठी सर्व संघ यूएईत दाखल झाले. चेन्नई सुपर किंग्सचे ( Chennai Super Kings) दोन खेळाडू व १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं सर्वांचं टेंशन वाढलं होतं. त्यात संघातील प्रमुख खेळाडू सुरेश रैना यानं वैयक्तिक कारण देत स्पर्धेतूनच माघार घेतली. त्याच्या या माघारीमागे कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) सोबत झालेला वाद असल्याची चर्चा रंगली होती.

सुनील गावस्कर यांची वादग्रस्त कमेंट ( GAVASKAR’S COMMENT ON ANUSHKA SHARMA) - यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये विराट कोहलीला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि एका सामन्यात भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी समालोचन करताना केलेली कमेंट वादात अडकली. विराटनं लॉकडाऊनमध्ये अनुष्का शर्माच्या गोलंदाजीवर सराव केला, अशी कमेंट त्यांनी केली होती. ( विराट व अनुष्काचा क्रिकेट खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यावरून गावस्कर यांनी ही कमेंट केली होती) त्यावरून तुफान राडा झाला. अनुष्का शर्मानंही खरमरीत पोस्ट लिहून निषेध व्यक्त केला होता.

आकाश चोप्रा व जिमी निशॅम आमने सामने ( THE AAKASH CHOPRA-JAMES NEESHAM FACE-OFF) - किंग्स इलेव्हन पंजाबनं न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी निशॅम याला संधी दिल्यावरून आकाश चोप्रा यांनी टीका केली. त्यावरून निशॅमनं आकाश चोप्राचा आयपीएल रेकॉर्ड सोशल मीडियावर ट्विट करून सडेतोड उत्तर दिले होते.

महेंद्रसिंग धोनीनं डोळे वटारले अन् अम्पायरनं निर्णय बदलला ( REIFFEL BUCKLES DOWN TO DHONI) - चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातल्या सामन्यात शार्दूल ठाकूरनं व्हाईड बॉल टाकला होता, अम्पायर तसा इशारा करणार तितक्यात यष्टिंमागून महेंद्रसिंग धोनीनं रागानं पाहिलं आणि अम्पायरनं निर्णय दिलाच नाही. त्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

शॉर्ट रननं किंग्स इलेव्हन पंजाबचा विजय हिरावला ( THE SHORT-RUN HOWLER) - दिल्ली कॅपिटल्सच्या १५८ धावांचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबच्या ख्रिस जॉर्डननं घेतलेली धाव अम्पायर नितीन मेनन यांनी शॉर्ट रन जाहीर केली. त्यानंतर तो सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि दिल्लीनं तो जिंकला. यावरून पंजाबची मालकिण प्रीति झिंटा हीनं नाराजी व्यक्त केली होती.