IPL 2021 schedule : आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे संघनिहाय वेळापत्रक, फक्त एका क्लिकवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 08:14 PM2021-07-25T20:14:41+5:302021-07-25T20:18:47+5:30

IPL 2021 schedule : MI, CSK, SRH, KKR, PBKS, RCB, RR, DC schedule in one click इंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. संयुक्त अरब अमिराती येथे 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत उर्वरित 31 सामने खेळवण्यात येणार आहेत. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 19 सप्टेंबरला सामना रंगणार असल्याचे वृत्त समोर आले आहे आणि हा सामना दुबईत खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या सामने दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येतील.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!