IPL 2021 : नेट्समध्ये धोनीची तुफानी फटकेबाजी, केली हेलिकॉप्टर शॉटची आतषबाजी

MS Dhoni in IPL 2021: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीलएलच्या नव्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचे नेतृत्व करणारा धोनी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असून, त्याने नेट्समध्ये सराव करताना मोठमोठे फटके लगावले.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीलएलच्या नव्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचे नेतृत्व करणारा धोनी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असून, त्याने नेट्समध्ये सराव करताना मोठमोठे फटके लगावले. आता चेन्नई सुपर किंग्सने धोनीच्या तुफानी फटकेबाजीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

चेन्नई सुपरकिंग्सचा संघ आयपीएलमध्ये आपला पहिला सामना १० एप्रिल रोजी खेळणार आहे. चेन्नईचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सच्या संघासोबत होणार आहे. आता ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी महेंद्र सिंह धोनी ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे ते पाहून चेन्नई सुपरकिंग्सला काहीचा दिलासा मिळाला असेल. नेट प्रॅक्टिस करत असताना धोनीने हेलिकॉप्टर शॉटही लगावला.

चेन्नई सुपरकिंग्ससाठी आयपीएलचा मागचा हंगाम निराशाजनक ठरला होता. मात्र गेल्या हंगामातील हे अपयश विसरून यशाच्या दिशेने आगेकूच करण्याचा चेन्नई सुपरकिंग्सचा मानस आहे. यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० मध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यातही चेन्नईचा संघ अपयशी ठरला होता. आयपीएलच्या इतिहात चेन्नईचा संघ पहिल्यांदाच प्राथमिक फेरीत बाद झाला होता.

चेन्नई सुपरकिंग्सच्या संघामध्ये वयस्कर खेळाडूंचा भरणा आहे. ही बाब आयपीएलमध्ये चेन्नईसाठी कमकुवत दुवा ठरू शकते. स्वत: कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, अंबाती रायडू आणि इम्रान ताहीरसारखे चेन्नई सुपरकिंग्समधील वयस्कर खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. तसेच देशांतर्गत क्रिकेटही खेळत नाहीत. अशा परिस्थितीत सरावाची कमतरता चेन्नईच्या संघाला अडचणीची ठरू शकते. तसेच धोनीलाही पूर्वीप्रमाणे मॅच फिनिशरची भूमिका पार पाडता येत नाही आहे. तीसुद्धा चेन्नईसाठी चिंतेची बाब असेल.

चेन्नई सुपरकिंग्सला गतवर्षी आपल्या कमकुवत फलंदाजीमुळे ढेपाळला होता. त्यामुळे या हंगामात कामगिरी सुधरवायची असेल तर चेन्नईला फलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल. एवढेच नाही तर चेन्नईच्या गोलंदाजांनाही महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागेल.

यंदाच्या आयपीएल २०२१ साठी चेन्नईचा संघ पुढीलप्रमाणे आहे - - Marathi News | यंदाच्या आयपीएल २०२१ साठी चेन्नईचा संघ पुढीलप्रमाणे आहे - | Latest cricket Photos at Lokmat.com

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना (उपकर्णधार), अंबाती रायडू, के. एम. आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डू प्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनडिंगी, मिशेल सेंटनर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम करण, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी.हरि निशांत.