IPL 2021 Mini Auction : ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्यावर तगडी बोली लागणार; जाणून घेऊया कोण कोण आहेत शर्यतीत

इंडियन प्रीमिअर लीगसाठी ( IPL 2021) १८ फेब्रुवारीला मिनी ऑक्शन चेन्नईत होणार आहे. BCCIनं आजच याबाबतची अधिकृत घोषणा केली. आयपीएल गव्हर्निंग कांऊन्सिलची ६ जानेवारीला बैठक झाली आणि त्यात IPL 2021 Mini Auction घेण्याचा निर्णय घेतला. त्यात २१ जानेवारीपर्यंत रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याच्या सूचना बीसीसीआयनं केल्या होत्या. त्यानुसार सर्व फ्रंचायझींनी मिळून १३९ खेळाडूंना कायम राखले, तर ५७ खेळाडूंना रिलीज केले.

ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) दोन मोठ्यानावांसह या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंसाठी चुरस रंगताना पाहायला मिळेल. शिवाय बंदीची कारवाई पूर्ण करून एस श्रीसंतही मैदानावर उतरला आहे. त्यात त्याला कोण घेतं, याचीही सर्वांना उत्सुकता आहे. अर्जुन तेंडुलकरनं मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून नुकतंच पदार्पण केलं आणि तोही या लिलावासाठी पात्र ठरला आहे.

प्रत्येक संघाला २५ खेळाडूंचा कोटा पूर्ण करायची आहे आणि त्यानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( १३), किंग्स इलेव्हन पंजाब ( ९), राजस्थान रॉयल्स ( ८), कोलकाता नाइट रायडर्स ( ८) यांना सर्वाधिक खेळाडू ताफ्यात घ्यायचे आहेत, तर सनरायझर्स हैदराबाद ( ३) ला सर्वात कमी खेळाडू घ्यायचे आहेत.

RCB कडे ३५.९० कोटी शिल्लक आहेत. त्यानंतर CSK ( २२.९ कोटी), SRH ( १०.१ कोटी), DC ( १२.९० कोटी), KKR ( १०.७५ कोटी ), MI ( १५.३५ कोटी), KXIP ( ५३.२० कोटी), RR ( ३४.८५ कोटी) यांनाही शिल्लक बजेटमध्ये खेळाडू ताफ्यात दाखल करून घ्यायचे आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर - रिलीज खेळाडू : मोईन अली, शिवम दुबे, गुरकीरत सिंह मान, एरॉन फिंच,ख्रिस मॉरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, डेल स्टेन, इसुरु उडाना, उमेश यादव;

चेन्नई सुपर किंग्स - रिलीज खेळाडू : केदार जाधव, हरभजनसिंग, मुरली विजय, पीयूष चावला, मोनू कुमार, शेन वॉटसन

सनरायजर्स हैदराबाद - रिलीज खेळाडू : बिली स्टेनलेक, विराट सिंह, बावनका संदीप, फैबियन एलन आणि संजय यादव

दिल्ली कॅपिटल्स - रिलीज खेळाडू : मोहित शर्मा, तुषार देशपांडे, कीमो पॉल, संदीप लामिछाने, एलेक्स कैरी, जेसन रॉय

कोलकाता नाईटरायडर्स - रिलीज खेळाडू : टॉम बैंटन, ख्रिस ग्रीन, सिद्धेश लाड, निखिल नाइक, हॅरी गर्नी, एम सिद्धार्थ

मुंबई इंडियन्स - रिलीज खेळाडू : लसिथ मलिंगा, नाथन कुल्टर नाइल, जेम्स पॅटिन्सन, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल मॅक्लेनघन, प्रिंस बलवंत सिंह, दिग्विजय देशमुख

किंग्स इलेव्हन पंजाब - रिलीज खेळाडू : ग्लेन मॅक्सवेल, करु ण नायर, हार्डस विलोजेन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉटरेल, जिमी नीशम, कृष्णप्पा गौथम, तिजंदर सिंह

राजस्थान रॉयल्स - रिलीज खेळाडू : स्टीव स्मिथ, अंकित राजपूत, ओशेन थॉमस, आकाश सिंह, वरु ण एरॉन, टॉम कुरेन