IPL 2021, MI vs RCB : डोळा सुजला तरीही विराट कोहली मागे नाही हटला, क्षेत्ररक्षणानंतर सलामीला मैदानावर उतरला!

Indian Premier League 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Banglore) संघानं आयपीएल २०२१ची सुरूवात विजयानं केली. २०१२नंतर मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएलच्या पर्वातील पहिला सामना जिंकण्यात अपयश आलं. Virat Kohli’s Eye Slightly Injured

Indian Premier League 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Banglore) संघानं आयपीएल २०२१ची सुरूवात विजयानं केली. २०१२नंतर मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएलच्या पर्वातील पहिला सामना जिंकण्यात अपयश आलं.

मुंबईनं ( MI) विजयासाठी ठेवलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना RCBचाही घाम निघाला, परंतु एबी डिव्हिलियर्सनं ( AB de Villiers) मॅच विनिंग खेळी केली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात पाच विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलनं ( Harshal Patel) RCBची विजयी धाव घेतली.

विराट कोहलीच्या संघानं ( Virat Kohli) हा सामना २ विकेट्सनं जिंकला. पण, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगन ( Yuvraj Singh) यानं विराटच्या एका निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सामन्यानंतर त्यानं सोशल मीडियावर जाहीरपणे ती बोलूनही दाखवली. IPL 2021 1st t20 mi vs rcb live match score updates chennai

नाणेफेक जिंकून विराटनं मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीला बोलावले. रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुर्दैवीरित्या धावबाद होऊन १९ धावांवर माघारी परतला. MI कडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या ख्रिस लीन ( ४९), सूर्यकुमार यादव ( ३१), इशान किशन ( २८) यांनी छोटेखानी योगदान देताना मुंबईला ९ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारून दिली.

हर्षल पटेलनं २०व्या षटकात चार धक्के दिले. यापैकी एक धावबाद होता. हर्षलनं २७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. RCBकडून अनिल कुंबळे व जयदेव उनाडकट यांच्यानंतर अशी कामगिरी करणार हर्षल तिसरा गोलंदाज ठरला. कायले जेमिन्सन व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.IPL 2021 : MI vs RCB  T20 Live Score Update

लक्ष्याचा पाठलाग करताना, विराट कोहली व वॉशिंग्टन सुंदर सलामीला आले, परंत सुंदर लगेच माघारी परतला. पदार्पणवीर रजत पाटीदारही फार कमाल करू शकला नाही. विराट कोहली ( ३३) व ग्लेन मॅक्सवेल ( ३९) यांनी अर्धशतकी भागीदारी करताना सामन्यात कमबॅक केले.

पण, ही दोघंही माघारी परतल्यानंतर एबी डिव्हिलियर्सवर जबाबदारी आली. त्यानं २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा करताना सामना चुरशीचा बनवला. तीन चेंडूंत तीन धावांची गरज असताना दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात एबी धावबाद झाला. पण, हर्षल व मोहम्मद सिराजनं २ चेंडूंत २ धाव घेत RCB चा विजय पक्का केला.IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score 

१९व्या षटकात कायले जेमिन्सनच्या गोलंदाजीवर कृणाल पांड्यानं मारलेला चेंडू टिपण्याची सोपी संधी विराटकडे होती, परंतु त्याच्या हाताच्या मधून चेंडू उजव्या डोळ्याच्या खालच्या बाजूला आदळला. पण, विराटनं मैदान सोडलं नाही, त्यानं क्षेत्ररक्षणही केलं अन् सलामीला येऊन महत्त्वाची खेळीही साकारली.