IPL 2021, MI vs RCB : RCBच्या विजयानंतर नेटिझन्स सूसाट, एबी डिव्हिलियर्सच्या भन्नाट मीम्सचा सुळसुळाट!

Indian Premier League 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Banglore) संघानं आयपीएल २०२१ची सुरूवात विजयानं केली. २०१२नंतर मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएलच्या पर्वातील पहिला सामना जिंकण्यात अपयश आलं. मुंबईनं ( MI) विजयासाठी ठेवलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना RCBचाही घाम निघाला, परंतु एबी डिव्हिलियर्सनं ( AB de Villiers) मॅच विनिंग खेळी केली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात पाच विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलनं ( Harshal Patel) RCBची विजयी धाव घेतली. बंगलोरनं हा सामना दोन विकेट्सनं जिंकला. ( 10 best memes from Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore game )