Andre Russell : आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत मुंबई इंडियन्सचा निम्मा संघ तंबूत पाठवला, अनेक विक्रमांचा पाऊस पाडला!

IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : Andre Russell take 5 wickets सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांची फटकेबाजी वगळता Mumbai Indiansच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. Kolkata Knight Riders च्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं.

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांची फटकेबाजी वगळता Mumbai Indiansच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. Kolkata Knight Riders च्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं.

रोहितचा आजचा खेळ फार संथ वाटला. त्यात हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, इशान शर्मा यांच्याकडूनही अपेक्षित कामगिरी न झाल्यानं MI ला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत ५ विकेट्स घेत मुंबईला मोठे धक्के दिले. मुंबईनं अखेरच्या पाच षटकांत ७ विकेट्स गमावल्या.

IPL 2021मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकला ( २) फार कमाल दाखवता आली नाही. वरूण चक्रवर्थीनं दुसऱ्याच षटकात त्याला राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) जराही दडपण न घेता आक्रमक खेळ केला.

सूर्या व रोहित शर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. सूर्यानं ३६ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५६ धावा चोपल्या. रोहितनं ३२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. कमिन्सनं २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सचा डाव १५२ धावांवर गडगडला.

अवघ्या दोन षटकांत पाच विकेट्स घेणारा आंद्रे रसेल हा आयपीएल इतिहासातील पहिलाच गोलंदाज ठरला

आंद्रे रसेलनं १५ धावांत ५ विकेट्स घेतल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून ही आयपीएलमधील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. यापूर्वी हा विक्रम सुनील नरीन ( 5/19) याच्या नावावर होता.

पाच विकेट्स घेतल्यानंतर आंद्रे रसेलनं KKRच्या लोगोला किस केलं. हर्षल पटेल याच्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध एका डावात पाच विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला.

आतापर्यंत ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये फक्त पाच गोलंदाजांना दोन षटकांत पाच विकेट्स घेता आल्या आहेत. आंद्रे रसेल याच्याआधी राशिद खान ( वि. आयर्लंड, २०१७), अंकित राजपूत ( वि. त्रिपुरा, २०१९), विल विलियम्स ( वि. वेलिंग्टन, २०२०) व खिझार हयात ( वि. हाँगकाँग, २०२०) यांनी हा पराक्रम केला आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धी ही प्रतिस्पर्धी गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. आंद्रे रसेलनं १५ धावांत ५ विकेट्स घेतल्या. त्यानंतर हर्षल पटेल ( ५-२७), रोहित शर्मा ( ४-६, २००९) आणि सॅम्युएल बद्री ( ४-९, २०१७) यांचा क्रमांक येतो.