IPL 2021 : गौतम गंभीर खवळला; KKRच्या कर्णधाराला नको नको ते बोलला, त्याच्याजागी भारतीय कर्णधार असता तर...

भारताचा माजी सलामीवीर आणि कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली.

भारताचा माजी सलामीवीर आणि कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. आयपीएलच्या १४व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाच्या ४ बाद २०४ धावांचा पाठलाग करताना KKRला अपयश आलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं आयपीएल २०२१मधील विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. रविवारी झालेल्या सामन्यात RCBनं कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेल ( ७८) व एबी डिव्हिलियर्सच्या ( ७६*) फटकेबाजीनं KKRच्या गोलंदाजांना हतबल केले.आयपीएलच्या इतिहासात RCBनं प्रथमच पर्वातील सलग तीन सामन्यांत विजय मिळवला.

बंगलोरच्या ४ बाद २०४ धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाताला ८ बाद १६६ धावा करता आल्या. आंद्रे रसेल २० चेंडूंत ३१ धावांत बाद झाला अन् KKRचा पराभव निश्चित झाला. मोहम्मद सिराजनं १९व्या षटकात फक्त एक धाव दिली.

वरुण चक्रवर्थीनं त्याच्या पहिल्याच षटकात विराट कोहली व रजत पाटीदार यांना बाद केले, परंतु एबी डिव्हिलियर्स व ग्लेन मॅक्सवेल यांनी KKRला मोठी मजल मारून दिली. वरूणकडून एक षटक फेकून घेतल्यानंतर त्याच्याजागी गोलंदाजीला शाकिब अल हसनला पाचारण करणाऱ्या KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन याच्यावर गंभीर खवळला.

आतापर्यंत पाहिलेलं सर्वात खराब नेतृत्व अशी टीका त्यानं केली. तो म्हणाला,''विराट कोहली याची विकेट ही मोठीच होती, त्यात काहीच शंका नाही. पण, अशा प्रकारचे विचित्र नेतृत्व मी आयुष्यात पाहिले नाही. एक गोलंदाज पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेतो आणि त्यानंतर त्याला पुढचं षटक टाकायला दिले जात नाही. आश्चर्यच आहे.''

''फॉर्मात असलेले फलंदाज मैदानावर आहेत, हे तुम्हाला माहित असताना त्यांना पहिल्या सहा षटकांत कसं बाद करता येईल, याचा विचार करायला हवा. वरुण चक्रवर्थीनं तिसरी विकेट्स घेतली असती किंवा ग्लेन मॅक्सवेललाच बाद केलं असतं. तिथेच हा सामना संपला असता. एबी डिव्हिलियर्स होता, हे माहित्येत. पण, त्याच्यावरील दडपण अधिक वाढले असते,''असेही गंभीरनं स्पष्ट केलं.

नशीबानं असा मुर्खपणा भारतीय कर्णधारानं केली नाही, याचे गंभीरनं समाधान मानले. तसे झाले असते तर त्याच्यावर आतापर्यंत टीका सुरू झाली असती, असेही तो म्हणाला.

''भारतीय कर्णधाराकडून ही चूक झाली नाही, याचा आनंद आहे. असं झालं असतं तर अनेकांनी टीकेची तलवार चालवण्यास सुरुवात केली असती. आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वात विचित्र नेतृत्व आहे,''असं KKRला दोन जेतेपद जिंकून देणारा गंभीर म्हणाला.