IPL 2021 Auction : ३९ स्वदेशी अन् २२ परदेशी खेळाडूंवर लागेल १९६ कोटींपर्यंत बोली; जाणून घ्या प्रत्येक संघाकडे किती रक्कम

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. २०२०त यूएईत आयपीएलचे सामने खेळवल्यानंतर यंदा ही लीग भारतातच खेळवण्याच्या हालचाली BCCIनं सुरु केल्या आहेत. २०२१च्या आयपीएलसाठी फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यात थोडीफार बदल करण्याची संधी BCCIनं दिली आहे. त्यानुसार सर्व फ्रँचायझींनी आपापल्या ताफ्यातील काही खेळाडूंना रिलीज केले आणि नव्या खेळाडूंसाठी जागा रिक्त केली आहे. पुढील महिन्यात आयपीएल २०२१साठी मिनी ऑक्शन होणार आहे. काल झालेल्या रिटेशनमध्ये सर्व फ्रँचायझींनी मिळून १३९ खेळाडूंना कायम राखले, तर ५७ खेळाडूंना रिलीज केले.

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर - रिलीज खेळाडू : मोईन अली, शिवम दुबे, गुरकीरत सिंह मान, एरॉन फिंच,ख्रिस मॉरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, डेल स्टेन, इसुरु उडाना, उमेश यादव; रिटेन खेळाडू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे; ३५.९० कोटी शिल्लक- यातून त्यांना ९ भारतीय व ४ परदेशी खेळाडूंना ताफ्यात घ्यायचे आहे.

चेन्नई सुपर किंग्स - रिलीज खेळाडू : केदार जाधव, हरभजनसिंग, मुरली विजय, पीयूष चावला, मोनू कुमार, शेन वॉटसन; रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन; २२.९ कोटी शिल्लक - चेन्नईला ६ भारतीय व १ परदेशी खेळाडूची जागा भरायची आहे.

सनरायजर्स हैदराबाद - रिलीज खेळाडू : बिली स्टेनलेक, विराट सिंह, बावनका संदीप, फैबियन एलन आणि संजय यादव; रिटेन खेळाडू : केन विलियम्सन, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, जॉनी बेयरस्टो, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, मिचेल मार्श, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, टी. नटराजन, शहबाज नदीम, राशिद खान, बासिल थम्पी, सिद्धार्थ कौल; १०.१ कोटी रुपये शिल्लक - २ भारतीय व १ विदेशी खेळाडूची जागा रिक्त

दिल्ली कॅपिटल्स - रिलीज खेळाडू : मोहित शर्मा, तुषार देशपांडे, कीमो पॉल, संदीप लामिछाने, एलेक्स कैरी, जेसन रॉय; रिटेन खेळाडू : शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, अवेश खान, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्तजे, मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, क्रिस वोक्स, डॅनियल सॅम्स; १२.९० कोटी शिल्लक - ४ भारतीय व २ परदेशी खेळाडूंची जागा रिक्त

कोलकाता नाईटरायडर्स - रिलीज खेळाडू : टॉम बैंटन, ख्रिस ग्रीन, सिद्धेश लाड, निखिल नाइक, हॅरी गर्नी, एम सिद्धार्थ; रिटेन खेळाडू : शुभमन गिल, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, नीतीश राणा, सुनील नरेन, कुलदीप यादव, हैरी गर्नी, लोकी फर्ग्यूसन, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, पॅट कमिन्स इयोन मोर्गन, वरुण चक्र वर्ती, सिद्ध कृष्ण, रिंकूसिंग, संदीप वॉरियर, निखिल नाइक आणि राहुल त्रिपाठी; १०.७५ कोटी शिल्लक - ६ भारतीय व २ परदेशी खेळाडूंची जागा रिक्त

मुंबई इंडियन्स - रिलीज खेळाडू : लसिथ मलिंगा, नाथन कुल्टर नाइल, जेम्स पॅटिन्सन, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल मॅक्लेनघन, प्रिंस बलवंत सिंह, दिग्विजय देशमुख; रिटेन खेळाडू : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीतसिंग; १५.३५ कोटी शिल्लक - ३ भारतीय व ४ परदेशी खेळाडूंची जागा रिक्त

किंग्स इलेव्हन पंजाब - रिलीज खेळाडू : ग्लेन मॅक्सवेल, करु ण नायर, हार्डस विलोजेन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉटरेल, जिमी नीशम, कृष्णप्पा गौथम, तिजंदर सिंह; रिटेन खेळाडू : केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंह, सरफराज खान, दीपक हुड्डा, सिमरन सिंह, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नळकांडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड़, इशान पोरेल; ५३.२० कोटी शिल्लक - ४ भारतीय व ५ परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा

राजस्थान रॉयल्स - रिलीज खेळाडू : स्टीव स्मिथ, अंकित राजपूत, ओशेन थॉमस, आकाश सिंह, वरु ण एरॉन, टॉम कुरेन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंह; रिटेन खेळाडू : संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवितया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, ॲन्ड्रयू टाय जयदेव उनादकट, मयंक मारकंडे, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा आणि रॉबिन उथप्पा; ३४.८५ कोटी रुपये शिल्लक - ५ भारतीय व ३ परदेशी खेळाडूंसाठी जागा रिक्त