IPL 2020 : शुबमन गिलची जबरदस्त फिल्डिंग; सारा तेंडुलकरनं Hearts Emojisनं शेअर केली पोस्ट

कोलकाता नाइट रायडर्सचा ( Kolkata Knight Riders) युवा फलंदाज शुबमन गिल याच्याकडे टीम इंडियाचा भावी सलामीवीर म्हणून पाहिले जात आहे. भारतातील सध्याच्या फळीतीय युवा फलंदाजांमध्ये तो आघाडीवर आहे.

Indian Premier Leagueमध्ये त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळून आहेत. त्या सर्वांमध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर ही पण आहे.

KKRकडून त्याने आतापर्यंत 28 सामन्यांत 132.36च्या स्ट्राइक रेटनं 499 धावा केल्या आहेत, त्यात 4 अर्धशतकांचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.

सुर्यकुमार यादव (47) आणि रोहितनं 54 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकार खेचून केलेल्या 80 धावांच्या जोरावर MIला 20 षटकांत 5 बाद 195 धावा करता आल्या.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या चतूर माऱ्यासमोर इयॉन मॉर्गन आणि आंद्रे रसेल या बिग हिटर फलंदाजांनाही फटके मारता येत नव्हते. KKRला 20 षटकांत 9 बाद 146 धावा केल्या.

पण, शुबमन गिलनं क्षेत्ररक्षणात केलेल्या जबरदस्त कामगिरीचे सारानं कौतुक केलं.

काही दिवसांपूर्वी सारा आणि शुबमन यांनी एकाच वेळी एकच पोस्ट करून चर्चेला निमित्त दिलं होतं. या दोघांनी ’I spy’ अशी इंस्टाग्राम पोस्ट लिहिली होती.

त्यापूर्वीही गिल यानं कार घेतल्यानंतर सारनं त्याचे अभिनंदन केलं होतं आणि हार्दिक पांड्यानं युवा फलंदाजाची फिरकी घेतली होती.

आजच्या सामन्यातील साराच्या या पोस्टनं पुन्हा चर्चेला कारण मिळालं आहे.