WOW : मुंबई इंडियन्सनं IPL 2020 साठी खास तयार केलेल्या जर्सीचा First Look, Video

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 12व्या मोसमात मुंबई इंडियन्सनं दिमाखात जेतेपद पटकावलं. चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा धक्का देताना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं चौथ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावले.

यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असून मुंबई इंडियन्सलाच प्रबळ दावेदार मानले जात आहे. जेतेपद कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्सनेही कंबर कसली आहे.

मुंबई इंडियन्सनं 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये जेतेपद पटकावलं आहे. यंदाही त्यांचे पारडे जड मानले जात आहे आणि त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे.

आयपीएल 2020च्या लिलावात मुंबई इंडियन्सनं ख्रिस लीन ( 2 कोटी), नॅथन कोल्टर नील ( 8 कोटी), सौरभ तिवारी ( 50 लाख), मोहसीन खान ( 20 लाख), दिग्विजय देशमुख ( 20 लाख) आणि प्रिंस बलवंत राय ( 20 लाख) आदी खेळाडूंना आपल्या ताफ्यात करून घेतले.

आयपीएलच्या 13 व्या मोसमासाठी मुंबई इंडियन्सनं रविवारी नव्या जर्सीचे अनावरन केलं. यंदा सॅमसंग हे मुंबई इंडियन्सचे टायटल स्पॉन्सर आहेत.