IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची समुद्रकिनारी सफर, Video

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020 ) 13व्या पर्वाचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.

मुंबई इंडियन्सनं 2013, 2015, 2017 आणि 2019 अशी चार जेतेपद नावावर केली आहेत. 19 सप्टेंबरला अबु धाबी येथे मुंबई इंडियन्स ( MI) मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सामना करण्यासाठी उतरणार आहे.

रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली Mumbai Indians जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. IPLमध्ये सर्वाधिक जेतेपद पटकावणारा Mumbai Indians हा एकमेव संघ आहे

मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावरही कुरघोडी केली. Instagram वर 50 लाख फॉलोअर्स झालेला Mumbai Indians हा IPLमधील पहिलाच संघ ठरला आहे. इंस्टाग्रामवर मुंबई इंडियन्सचे 50 लाख 36,029 फॉलोअर्स आहेत.