IPL 2020 Mid-Season Transfers मुळे होणार मोठे फेरबदल; मुंबई इंडियन्सच्या ओपनरसाठी रंगणार चढाओढ?

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३ व्या मोसमाला सुरुवात होऊन दोन आठवडे पूर्ण झाले. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) यांनी प्रत्येकी ८ गुणांसह गुणतक्त्यात अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान पटकावले आहे.

मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, फॅफ ड्यू प्लेसिस, रोहित शर्मा या अनुभवी खेळाडूंच्या तोडीत तोड कामगिरी करण्यात युवा खेळाडूंना यश आलं आहे. त्यामुळे लीग जसजशी उत्तरार्धाकडे जात आहे, तसतशी सर्वांची उत्सुकताही ताणली जात आहे. श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन हे दमदार खेळ करून टीम इंडियात आपले स्थान पक्के करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

पण, याचबरोबर काही संघांतील कमकुवत बाबीही समोर येत आहेत. त्यामुळे प्रत्येक संघ त्या दृष्टीनं काम करत आहे. यंदाच्या मोसमात त्यांच्याकडे आणखी एक नामी संधीही आहे. IPL 2020 Mid-Season Transfers च्या माध्यमातून पत्येक संघ कमकुवत बाबी भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

काय आहे हे IPL 2020 Mid-Season Transfers? - BCCIने यंदाच्या मोसमापासून फ्रँचायझींना अन्य संघांकडून खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुभा दिली आहे. मागील मोसमात ही संधी केवळ अन कॅप म्हणजेच राष्ट्रीय संघांकडून न खेळलेल्या खेळाडूंपुरती मर्यादित होती, परंतु आता राष्ट्रीय खेळाडूंचीही अदलाबदल शक्य आहे.

IPL 2020 Mid-Season Transfers नियम - लीगच्या मध्यंतरापर्यंत खेळाडूनं दोनपेक्षा अधिक सामने खेळलेले नसावेत. लीगच्या मध्यंतरानंतरच ही अदलाबदल करता येणार आहे. म्हणजे प्रत्येक संघानं प्रत्येकी ७ सामने खेळणे आवश्यक आहेत.

कोणते खेळाडू ठऱणार पात्र? - दोनपेक्षा कमी सामने खेळलेल्या खेळाडूंची अदलाबदल करता येईल.

कोणत्या संघातील कोणते खेळाडू ठरत आहेत पात्र ?

अदलाबदल करताना खेळाडूला देण्यात येणारी रक्कम फ्रँचायझीच्या पर्समधून वजा होणार नाही.

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - केएम आसीफ, इम्रान ताहीर, नारायण जगदीशन, कर्ण शर्मा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, आर साई किशोर, जोश हेझलवूड

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) - अजिंक्य रहाणे, आवेश खान, हर्षल पटेल, इशांत शर्मा, किमो पॉल, संदीप लामीछाने, अॅलेक्स कॅरी, ललित यादव, डॅनिएल सॅम्स, तुषार देशपांडे, मोहित शर्मा

किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) - अर्षदीप सिंग, दर्शन नळखांडे, कृष्णप्पा गोवथम, हार्डस विलजोईन, ख्रिस गेल, हरप्रीत ब्रार, जगदीशा सुचिथ, मनदीप सिंग, मुजीब उर रहमान, मुरुगन अश्विन, दीपक हुडा, इशान पोरेल, ख्रिस जॉर्डन, सिमरन सिंग, तजींदर सिंग

कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) - प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर्स, सिद्धेश लाड, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, टॉम बँटन, निखिल नाईक, अली खान

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) - आदित्य तरे, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, जयंत यादव, शेर्फान रुथरफोर्ड, मिचेल मॅक्लेघन, ख्रिस लीन, नॅथन कोल्टर नील, सौरभ तिवारी, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय ( मुंबई इंडियन्सच्या ख्रिस लीनने एकही सामना खेळलेला नाही. त्याच्यासाठी चढाओढ रंगू शकते.)

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) - बसील थम्पी, बिली स्टँनलेक, मोहम्मद नबी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवास्तव गोस्वामी, सिद्धार्थ कौल, वृद्धीमान सहा, विजय शंकर, विराट सिंग,

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) - गुरकिरत सिंग मान, मोइन अली, मोहम्मद सिराज, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, डेल स्टेन, शाहबाज अहमद, पवन देशपांडे, अॅडम झम्पा

राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) - मयांक मार्कंडे, अंकित राजपूत, मनन वोहरा, महिपाल लोम्रेर, शंशांक सिंग, वरूण आरोन, कार्तिक त्यागी, ओशाने थॉमस, अनिरुद्ध जोशी, अँण्ड्रू टे, आकाश सिंग, अनुज रावत

Read in English