IPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल

mumbai indians vs chennai super kings : आजपासून सुरू होत असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सपरकिंग्सचे संघ आमने-सामने येणार आहेत. या लढतीत हे सहा खेळाडू कमाल दाखवू शकतात.

जगावर आलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलला आजपासून प्रारंभ होत आहे. आज सलामीच्या लढतीत गतविजेत्या मुंबईची गाठ गेल्या वर्षीच्या उपविजेत्या चेन्नईशी पडणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये असे काही खेळाडू आहेत जे एकहाती सामन्याचा निकाल बदलवू शकतात. अशा खेळाडूंचा घेतलेला हा आढावा.

महेंद्रसिंह धोनी - Marathi News | महेंद्रसिंह धोनी | Latest cricket Photos at Lokmat.com

आयपीएलमध्ये आज होणाऱ्या लढतीच्या माध्यमातून महेंद्रसिंह धोनी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य लढतीनंतर धोनीने स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. असे असले तरी तो या लढतीतील महत्त्वाचा खेळाडू असेल. तसेच फलंदाजीसोबतच धोनीच्या नेतृत्वावरही चेन्नई सुपरकिंग्सची मदार असेल. आयपीएलच्या मागच्या हंगामात धोनीने ८३ च्या सरासरीने ४१६ धावा फटकावल्या होत्या.

दीपक चहर - Marathi News | दीपक चहर | Latest cricket Photos at Lokmat.com

आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात वेगवान गोलंदाज दीपक चहर हा चेन्नई सुपरकिंग्ससाठी सर्वात मोठा मॅचविनर म्हणून समोर आला आहे. चहर पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करतो आणि त्याची गोलंदाजी नेहमीच बड्या बड्या फलंदाजांसाठी आव्हान ठरते. आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला दीपक चहरने दोन वेळा बाद केलेले आहे. त्यामुळे आजही त्याच्या गोलंदाजीचा सामना करताना मुंबईला सावध राहावे लागणार आहे.

ड्वेन ब्राव्हो - Marathi News | ड्वेन ब्राव्हो | Latest cricket Photos at Lokmat.com

ड्वेन ब्राव्हो हा असा अष्टपैलू खेळाडू आहे. जो फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा कुठल्याही माध्यमातून सामन्याचे पारडे चेन्नई सुपरकिंग्सच्या बाजूने वळवू शकते. नुकत्याच आटोपलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त कामगिरी करत ट्रिनबेगो नाइटरायडर्सला विजेतेपद मिळवून दिले होते. ब्राव्होने आतापर्यंत मुंबईविरुद्ध २८ बळी आणि २८१ धावा फटकावलेल्या आहे.

रोहित शर्मा - Marathi News | रोहित शर्मा | Latest cricket Photos at Lokmat.com

फलंदाज आणि कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सची मदार रोहित शर्मावर असेल. गतवर्षी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये रोहितने धडाकेबाज कामगिरी केली होती. आताही रोहित मुंबई इंडियन्सकडून सलामीला खेळणार आहे. त्यामुळे त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा मुंबईला असेल.

कायरन पोलार्ड - Marathi News | कायरन पोलार्ड | Latest cricket Photos at Lokmat.com

अष्टपैलू कायरन पोलार्ड हा मुंबई इंडियन्ससाठी नेहमीच मोठा मॅचविनर राहिला आहे. नुकत्याच आटोपलेल्या सीपीएलमध्ये पोलार्डने २०४ च्या स्ट्राइक रेटने २०७ धावा फटकावल्या आहेत. तसेच चेन्नईविरुद्धही पोलार्डने नेहमीच धडाकेबाज कामगिरी केलेली आहे. त्याने चेन्नईविरुद्धा १६७ च्या स्ट्राइक रेटने ४४९ धावा कुटल्या आहेत.

जसप्रीत बुमराह - Marathi News | जसप्रीत बुमराह | Latest cricket Photos at Lokmat.com

भाराताचा आघाडीचा गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहवर यावर्षी मुंबई इंडियन्सची मदार असणार आहे. बुमराहची गोलंदाजी चेन्नईसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत आलेली आहे. गतवर्षी अंतिम लढतीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर चेन्नईचा संघ ढेपाळला होता. मात्र यावर्षी दुखापतीमुळे बुमराहच्या गोलंदाजीवर परिणाम होऊ शकतो.

Read in English