IPL 2020: Googleने लोकेश राहुलचं लग्नच लावलं; जाणून घ्या कोण आहे त्याची पत्नी!

सध्या Google सेलिब्रेटींचं लग्न जुळवायचं काम करतोय की काय, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरची कन्या सारा हिच्या प्रोफाईलमध्ये शुबमन गिल याची पत्नी असे Googleने दाखवले.

आज तर त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबचा ( KXIP) कर्णधार आणि टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) याचं लग्न लावलं आणि त्याच्या पत्नीचं नाव जाहीर केलं.

KXIPचा कर्णधार लोकेश राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या प्रेमाच्या चर्चा अनेकदा रंगल्या.

त्यामुळे गुगुलवर या दोघांबाबत जाणून घेण्यासाठी नेटिझन्सनं सर्च इंजिनचं डोकं खांजवलं.

राहुल आणि अथिया हे चांगले मित्र आहेत.

एकमेकांच्या सोशल अकाऊंटवर दोघंही लाईक्स कमेंट्स करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चाही रंगल्या आहेत.

त्यामुळेच गुगलनं अथिया शेट्टीच्या प्रोफाईलवर लोकेश राहुलची पत्नी असे नमूद केले. सध्या सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.