भारताचे 'हे' फलंदाज राहिले नंबर वन; देशाची उंचावली मान

कसोटी क्रमवारीमध्ये भारताच्या फलंदाजांनी अव्वल स्थान पटकावत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. यामध्ये सर्वात पहिले भारतीय ठरले माजी महान फलंदाज सुनील गावस्कर. 1979 साली 916 गुणांसह गावस्कर यांनी अव्वल स्थान पटकावले होते.

दिलीप वेंगसरकर यांनी 1988 साली न्यूझीलंडविरुद्ध खेळताना 837 गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले होते.

भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर तब्बल 1157 दिवस अव्वल स्थानावर विराजमान होता. आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने सर्वाधिक 898 गुण कमावले होते.

भारताचा 'द वॉल' म्हणून प्रसिद्ध असलेला खेळाडू म्हणजे राहुल द्रविड. त्याने सर्वाधिक 892 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते.

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने 886 गुणांसह कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते.

भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने 2010 साली श्रीलंकेविरुद्ध सलग दोन शतके लगावली होती. यावर्षी सेहवागने 866 गुणांसह अव्वल स्थान मिळवले होते.

भारतासाठी कसोटी क्रमवारीत सर्वाधिक गुण पटकावले आहेत ते भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीने. कोहलीने गावस्कर यांचा विक्रम मोडीत काढत 934 गुणांची कमाई केली आहे.