चलो भाई, छुट्टी खत्म…!; रोहित शर्मानं ट्विट केलं अन् विराटसह टीम इंडियाचे खेळाडू लागले कामाला, See Photo

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची सुट्टी संपली आहे. ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची सुट्टी संपली आहे. जागितक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर टीम इंडियाचे खेळाडू २० दिवसांच्या सुट्टीवर गेले होते आणि त्यात त्यांनी कुटुंबीयांसह लंडनमध्ये भटकंती केली. ही सुट्टी संपली असून टीम इंडियाचे खेळाडू सरावाला लागले आहेत.

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा यानं 'चलो भाई, छुट्टी खत्म… अब काम शुरू!' असे केलेले ट्विट सध्या चर्चेत आहे. ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी खेळाडू सरावाला लागले आहेत.

विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल यांनी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला, तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, उमेश यादव यांनीही मेहनत घेतली.

दरम्यान, भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तो नातेवाईकांच्या घरी क्वारंटाईनमध्ये आहे. त्याच्यासह थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंदा यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

त्यांच्या संपर्कात आल्यामुळे भारताचा आणखी एक यष्टिरक्षक वृद्धीमान सहा याला विलगिकरणात जावे लागले आहे. भरत अरुण, राखीव सलामीवीर अभिमन्यू इस्वरन हेही विलगिकरणात आहेत.